26 April 2024 4:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार
x

हाच काँग्रेस आणि भाजप'मधील फरक; राजीव गांधींवरील होर्डिंग्जवरून काँग्रेसचं भाजपला सडेतोड उत्तर

नवी दिल्ली : कालच भाजपाचे दिल्लीचे प्रवक्ते तेजिंदरपाल सिंग बग्गा यांनी दिल्लीतील अनेक ठिकाणी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी हे जमावाकडून होणाऱ्या हत्येचे जनक म्हणजे ‘फादर ऑफ द मॉब लिचिंग’ असल्याचे फलक लावले होते. परंतु काँग्रेसने त्यांना समंजस आणि सडेतोड उत्तर दिलं आहे.

काँग्रेसने सुद्धा माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या मृत्यूनंतर होर्डिंग लावले होते. त्याला उजाळा देत भाजपच्या दिल्लीतील पोश्टरबाजीला नम्र तसेच सडेतोड प्रतिउत्तर दिलं आहे. काँग्रेसने एक पोश्टर ट्विट करत भाजपच्या राजकारणाची खरडपट्टी काढली आहे. या ट्विट मध्ये काँग्रेसने काँग्रेसने त्यांचा एक पोश्टर शेअर करत त्याची तुलना काँग्रेसच्या कालच्या दिल्लीतील पोश्टरबाजीशी केली आहे.

त्यात म्हटलं आहे की, ‘प्रिय भाजपा, काँग्रेस आणि तुमच्यातील अंतर पाहा. आणखी काही काळ वाट पाहा. जनता तुमच्या अहंकार आणि द्वेषाला लवकरच उत्तर देईल, हा संस्कारांचा फरक आहे’, असे काँग्रेसचे प्रवक्ते प्रणव झा यांनी म्हटले. त्यात अजून भर म्हणजे काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, देशातील २००२ च्या दंगलीवेळी काही खास करू न शकलेल्या त्या दिवंगत पंतप्रधानांना श्रद्धांजली देण्याचे काँग्रेसवर संस्कार आहेत. परंतु भाजपच्या कार्यालयाबाहेर देशासाठी प्राण देणाऱ्या दिवंगत पंतप्रधानाबाबत तिरस्कारात्मक पोस्टर लावण्यात आल्याने, यातून भाजपची तुच्छ मानसिकता दिसून येते, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

हॅशटॅग्स

#Congress(527)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x