21 October 2019 4:10 PM
अँप डाउनलोड

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून बीड, औरंगाबाद, धुळे आणि जुन्नरच्या दौऱ्यावर

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून ६ दिवसांच्या बीड, औरंगाबाद, धुळे आणि जुन्नरच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात औरंगाबाद पासून होणार असून तिथे निरनिराळ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांचा मनसेत प्रवेश, तसेच कार्यकर्त्यांशी परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे.

त्यानंतर ३१ तारखेला बीड येथे शासकीय विश्रामगृहात राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येणार येईल. त्यानंतर ते केज’करीत रवाना होतील आणि तेथे सुमंत धस यांच्या कार्यक्रमात हजेरी लावतील आणि नंतर दिंद्रुड येथे एका पक्ष कार्यालयाचे उदघाटन करून ते धुळे जिल्ह्याच्या दिशेने रवाना होतील.

धुळे दौऱ्यादरम्यान, धुळे इंडियन मेडिकल हॉलमध्ये पक्ष पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी शाहूमहाराज नाट्यगृह धुळे येथे महाराष्ट्र सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात येणार असून राज ठाकरे त्या मेळाव्याला संबोधित करतील. त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी मनसेचे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी, त्यांच्या मतदारसंघात बांधलेल्या स्टेडियमच्या उदघाटन कार्यक्रमास रवाना होतील, असं पक्षाचे सचिव सचिन मोरे यांनी कळवलं आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(451)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या