2 July 2020 11:21 AM
अँप डाउनलोड

भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसोबत संरक्षण मंत्र्यांची तातडीची उच्चस्तरीय बैठक

India China, Ladakh, CDS General Bipin Rawat

नवी दिल्ली, २१ जून : लडाखमध्ये भारत चीन सीमेलग चिनी हवाईदलाची हालचाल वाढल्याचे दिसून आले आहे. यानंतर, भारतीय हवाई दलानेही आपल्या फॉरवर्ड बेसेसवर लढाऊ विमानं तैनात केली आहेत. आयएएफ प्रमुख एअर चिफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी शनिवारी ही माहिती दिली. ते येथील एअरफोर्स अकॅडमीच्या कम्‍बाइन्ड ग्रॅज्युएशन डे परेड निमित्त आले होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आधिकृत सूत्रांच्या हवाल्याने नवभारत टाइम्सने म्हटले आहे, की गलवान खोऱ्यात पेट्रोल पॉइंट 14 जवळील भागांत भारतीय लष्कर धैर्याने उभे आहे. येथेच 15-16 जूनच्या रात्री दोन्ही देशांदरम्यान हिंसक झटापट झाली होती. या घटनेनंतर लष्कराने म्हटले होते, की दोन्ही देशांचे सैन्य तेथून मागे हटले आहेत. “गलवानमध्ये दोन्ही देशांचे सैन्य आपापल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) आत आहे. मात्र, दोन्हीकडेही लष्कराची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लष्कर पूर्णपणे मागे हटलेले नाही.”

दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्यासहित तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली आहे आणि सध्यस्थितीवर सखोल चर्चा सुरु असल्याचं वृत्त आहे. परिस्थिती अधिक चिघळण्यापूर्वी योग्य ती खबरदारी आणि सतर्क राहण्याचे आदेश तिन्ही दलांना देण्यात आल्याचं वृत्त आहे.

 

News English Summary: India China clashes Defence Minister of India Rajnath Singh holds high level meeting with CDS General Bipin Rawat and three service chiefs on situation in Ladakh News Latest Updates.

News English Title: Defence Minister of India Rajnath Singh holds high level meeting with CDS General Bipin Rawat and three service chiefs on situation in Ladakh News Latest Updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#IndiaChina(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x