19 April 2024 12:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | भरवशाचे टॉप 7 शेअर्स स्वस्त झाले, पण व्हॉल्यूम लाखोमध्ये, संयम राखल्यास मिळेल मल्टिबॅगर परतावा IREDA Share Price | IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, सर्किट फिल्टरही वाढला, स्टॉक तुफान तेजीत येणार? Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, 1 वर्षात 412% परतावा देणारा 39 रुपयाचा शेअर तेजीत येणार? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत महिना SIP करा, हमखास 12 लाख रुपये परतावा मिळेल BYD Atto 3 | खुशखबर! आता BYD Atto 3 ई-कारला नो वेटिंग, झटपट डिलिव्हरी मिळणार, प्राईससह फीचर्स जाणून घ्या ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! महिना 10,000 रुपयांच्या SIP ने मिळेल 78.32 लाख रुपये परतावा, स्कीम लक्षात ठेवा Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
x

नरेंद्र मोदी नव्हे, सरेंडर मोदी...राहुल गांधींची टि्वटरवर बोचरी टीका

India China, PM Narendra Modi, Rahul Gandhi

नवी दिल्ली, २१ जून : चीन सीमेवर पूर्व लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्यानं टीका केली आहे. आता राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचे नावच बदलून हे तर खरे ‘सरेंडर मोदी’ असल्याची टीका टि्वटरवर केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर आता काँग्रेस विरुद्ध भाजपा असा शाब्दिक वॉर सुरू झाला आहे.

एकाबाजूला लडाखच्या गलवान खोऱ्यात २० जवानांच्या बलिदानानंतर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे, आता वायएसआर काँग्रेस आणि तेलंगाणा राष्ट्र समिती (टीआरएस) सारखे पक्ष पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की सर्वपक्षीय बैठकीनंतर जो वाद सुरू झाला आहे, त्यानंतर मी चिंतीत आहे. ही वेळ एकी दाखवण्याची आहे. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयाने ट्विट केले, की ही वेळ राजकारणाची नव्हे रणनीतीची आहे.

 

News English Summary: Rahul Gandhi has consistently criticized Prime Minister Narendra Modi after the clashes in East Ladakh on the Chinese border. Now Rahul Gandhi has changed the name of Narendra Modi and criticized him on Twitter for being a ‘surrender Modi’. After his criticism, now a war of words has started between the Congress and the BJP.

News English Title: Rahul Gandhi has changed the name of Narendra Modi and criticized him on Twitter for being a surrender Modi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x