14 December 2024 5:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Tulsi Leaves with Milk | दुधात तुळशीची पाने उकळल्याने हे मोठे फायदे होतात | कसे ते जाणून घ्या

Tulsi leaves with Milk

Tulsi Leaves with Milk | तुळशीची पाने दुधात उकळल्याने अनेक मोठे आजार दूर होतात. मात्र, हे दूध केव्हा आणि कसे प्यावे ते जाणून घेणे गरजेचे आहे. तुळशीची पाने अनेक गुणांनी समृद्ध असतात. कोणत्याही प्रकारे तुळशीचा वापर करा, त्याचा आरोग्याला फायदाच होतो. तसे, आपल्याला रोगामध्ये तुळशीची पाने कशी वापरायची हे माहीत आहे. पण तुम्हाला माहिती आहे काय, तुळशीची पाने रोज दुधात उकळवून प्यायल्यास या मोठ्या आजारांपासून सहज मुक्तता मिळते. पाहा कसे ते?

नैराश्य दूर होते (Depression)
आपल्याला रोजच्या दैनंदिन कामात आणि कार्यालयीन ताणामुळे किंवा कामाच्या ओझ्यामुळे जर आपण बऱ्याचवेळा ताणाव किंवा नैराश्यात असतो. त्यावेळी तुम्ही जर तुळशीची पाने दुधात उकळून प्या. त्यामुळे तुमचा मानसिक तणाव आणि चिंता दूर होतात.

दमा आजाराने त्रस्त आहात (Asthma)
श्वासोच्छवासाची समस्या, दमा यासारख्या आजाराने तुम्हाला त्रास होत असेल तर तुळशीची पाने दुधात उकळवून घ्या. असे केल्याने दम्याचा रुग्णांना या फायदा होईल. श्वास घेण्याचा त्रासही कमी होतो.

रोग प्रतिकारशक्ती (Migraine)
तुळशीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्मांच्या असल्यामुळे ते शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात. याशिवाय तुळशीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टीरियल आणि अँटीवायरल गुणधर्म देखील असतात, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला सर्दी, खोकला आणि सर्दीपासून दूर ठेवता येते.

मायग्रेशनचा त्रास:
तुळशीची पाने दुधात उकळवून प्यायल्याने डोकेदुखी किंवा मायग्रेनसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. तुळशीच्या दुधाचे नियमित सेवन केल्यास ही समस्या मुळापासून दूर होते.

मूतखडा:
जर एखाद्या व्यक्तीला मूतखड्याचा त्रास असेल तर त्याने रिकाम्या पोटात नियमितपणे तुळशीचे दूध प्यावे. असे केल्याने मूत्रपिंडातील मूतखड्याची समस्या दूर होतेच, शिवाय वेदना दूर होतात.

तुळशीच्या दुधाचे सेवन कसे करावे?
तुळशीचे दूध करण्यासाठी प्रथम दीड ग्लास दुधात ८ ते १० तुळशीची पाने घाला आणि उकळी येऊ द्या. दूध एक ग्लास होईलपर्यंत त्याला उकळी येऊ द्या, त्यानंतर गॅस बंद करा. दूध किंचित कोमट झाल्यावर ते प्या. या दुधाचे नियमित सेवन केल्यासच या आजारांपासून मुक्तता मिळू शकते.

News English Title: Tulsi leaves with Milk will remove these major diseases latest updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x