12 December 2024 1:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

ITR Filing | तुम्ही आधी भरलेल्या आयटीआर फॉर्ममधील चूक अशाप्रकारे सुधारू शकता | अधिक जाणून घ्या

ITR Filing

ITR Filing | इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. अनेक जण आयटीआर फायलिंगच्या शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहतात आणि त्यावेळी आयटीआरमध्ये एखादी चूक आढळली तर ती करण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही. आता आयटीआरमधील अनेक माहिती आधीच भरलेली असते. अशा परिस्थितीत रिटर्न भरण्यापूर्वी त्याच्याकडून तुमची माहिती नक्की करून घ्या. तसेच कोणत्याही प्रकारची चूक लक्षात आल्यास ती सुधारण्याचा पर्याय इन्कम टॅक्स पोर्टलद्वारे वापरा.

बँक खात्याचा तपशील सर्वात महत्त्वाचा :
टॅक्स सल्लागारांचे म्हणणे आहे की, परतावा अडकल्याच्या बहुतेक प्रकरणांमध्ये बँक खात्याशी संबंधित माहितीमध्ये गडबड होते. आयटीआर भरताना बँक खात्याशी संबंधित सर्व माहिती योग्य आहे का, हे पुन्हा एकदा तपासून पाहा. जर तुम्ही फॉर्म भरताना तुमच्या खात्याची माहिती चुकीच्या पद्धतीने भरली असेल तर तुमचा रिफंड यामुळे अडकून पडू शकतो. जर तुम्ही रिटर्न फाइल केले असेल आणि काही चूक झाली असेल तर तुम्हाला आयकर विभागाच्या साइटवरील बँक खात्याचा तपशील दुरुस्त करावा लागेल.

TIS आणि AIS :
पॅन क्रमांकाशी जोडलेले तुम्ही जे काही आर्थिक व्यवहार करता त्याची नोंद आयकर खात्याच्या करदाता माहिती विधान (टीआयएस) आणि वार्षिक माहिती विधानात (एआयएस) केली जाते. तो आधीच टॅक्स रिटर्न फॉर्ममध्ये भरलेला असतो. जर काही तपशील चुकीचा असेल तर तिथे लिहिलेल्या अभिप्रायावर क्लिक करा आणि ते चुकीचे आहे असे सांगा. आयकर विभाग त्यात सुधारणा करतो. असं झालं नाही तर तुम्हाला टॅक्स नोटीस मिळू शकते.

करसवलतीचा तपशील :
प्राप्तिकर कलम ८० सी अंतर्गत सूट वगळता अन्य गुंतवणुकीवरील सवलतीचा तपशील फॉर्म १६बीमध्ये दिला आहे. आपण दिलेल्या गुंतवणुकीच्या माहितीच्या आधारे कंपन्या या फॉर्ममध्ये तपशील भरतात. काही माहिती चुकली असेल तर आयटीआर भरताना माहिती द्या.

फॉर्म 16 आणि 16 ए चा तपशील :
पगारातून उगमस्थानी करकपात (टीडीएस) झाल्यास कंपन्या कर्मचाऱ्याला फॉर्म १६ देतात. तर पगाराव्यतिरिक्त व्याज, घरभाडे इत्यादींवर टीडीएसच्या वजावटीवर फॉर्म १६ ए देतात. आपल्या वजावटीतून तपशील तपासा.

अशा प्रकारे ITR रिफंडची स्थिती जाणून घ्या :
ज्यांनी रिटर्नसाठी शेवटच्या तारखेची वाट न पाहता रिटर्न भरले आहे, त्याच लोकांना बँक खात्यात टॅक्स रिफंड मिळू लागेल. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या परताव्याची स्थिती जाणून घ्यायची असेल, तर सर्वप्रथम आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर http://www. incometax.gov.in जा. यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. यानंतर ई-फाइल पर्यायात तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न्स निवडावेत. आता आयटीआरची स्थिती आणि कर परतावा देण्याची तारीख दिसून येईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: ITR Filing rectify the mistakes in the pre filled forms check details 18 July 2022.

हॅशटॅग्स

#ITR Filing(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x