15 August 2022 10:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Financial Tips | आर्थिक स्वातंत्र्यासाठी या 5 गोष्टी लक्षात ठेवा, सर्व आर्थिक चिंतांपासून होईल सुटका Numerology Horoscope | मंगळवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Old Salary Account | तुमच्या जुन्या सॅलरी अकाउंटमुळे तुम्हाला हे 5 नुकसान होतात, अशाप्रकारे लवकर बंद करा Ola S1 e-Scooter | ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, 141 किमी रेंजचा दावा, किंमतीसह सर्व माहिती जाणून घ्या Horoscope Today | 16 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Utsav Deposit Scheme | एसबीआयने सुरु केली उत्सव फिक्स्ड डिपॉझिट योजना, जाणून घ्या योजनेचे फायदे Gold Bond Scheme | तुम्हाला स्वस्त सोनं खरेदीची संधी मिळणार, जाणून घ्या कधीपर्यंत गुंतवणूक करू शकाल
x

भाजप नेत्यानो जबाबदारीनं वागा! 'एअर स्ट्राईक' सहभागातील महिला पायलट्सचे खोटे फोटो शेअर

Pakistan, IAF, PAF, Pulawama Attack

मुंबई : भारतीय वायुदलाने केवळ बारा दिवसात जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील भ्याड हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून त्यांना अद्दल घडवली. दरम्यान, या हल्ल्याचा भारतीय वायुदलाने केवळ १२ दिवसात बदला घेत दहशतवाद्यांचं तेरावं घातल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवरून व्यक्त होत आहेत.

तमाम देशवासियांकडून सदर कारवाईचे स्वागत होत असून भारतीय वायुदलाला सॅल्यूट देखील करण्यात येत आहे. त्यातच, या कारवाईनंतर एका महिला वैमानिकाचा फोटो चुकीच्या पद्धतीने समाज माध्यमांवरून व्हायरल करण्यात येत आहे. भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईत या महिला वैमानिकाचा सहभाग असल्याचा खोटा दावा करण्यात येत आहे. परंतु, आपल्या या कृत्यामुळे आपण देशातील सैनिकांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं जीवन धोक्यात घालत हे लक्षात ठेवायला हवं.

भारतीय वायू सेनेतील २००० मिराज एअर जेटच्या १२ विमानांनी पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला चढवला. या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. भारताच्या या हल्ल्यानंतर भारतातील समाज माध्यमातून देखील पाकिस्तानवर शाब्दीक वार सुरू झाले आहेत. परंतु, त्याचबरोबर भावनेच्या आहारीज जाऊन सोशल मीडियावर एका महिला पायलटचा फोटो शेअर करण्यात येत आहे. राजस्थानमधील भारतीय जनता पक्षाच्या नेत्या रिताल्बा सोलंकी यांनी एका महिला पायलटचा फोटो शेअर करुन तिचं अभिनंदन केलं आहे. विशेष म्हणजे भारताने पाकविरुद्ध केलेल्या हवाई हल्ल्यातील १२ विमानांपैकी एक विमान या महिला पायलटच्या हाती असल्याचंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

दरम्यान, उर्वशी जरीवाला असे या महिला पायलटेच नाव असून ती गुजरातमधील सुरतची आहे. विशेष म्हणजे ती सुरतमधील भुलका भवन शाळेची विद्यार्थीनी असल्याचेही अभिमानाने सांगण्यात येत आहे. या भाजपा नेत्याप्रमाणेच अनेक व्यक्तिगत अकाऊंटवरुनही या पायलट उर्वशी यांचे फोटो व्हायरल केले जात आहेत. तसेच जरीवाला यांच्या फेसबुकचे स्क्रीनशॉटरी शेअर करण्यात येत आहेत. मात्र, यामागील सत्य वेगळंच आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो भारतीय वायू दलातील महिला पायलटचा असून ती स्नेहा शेखावत असे तिचे नाव आहे. स्नेहा शेखावर या भारतीय वायू दलात दाखल होणाऱ्या पहिल्या महिला पायलट आहेत. त्यासोबतच आणखी एक फोटो व्हायरल होत असून तोही चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात येत आहे. अवंती चतुर्वेदी या पहिल्या महिला फायटर जेट पायलटचा हा फोटो आहे. मात्र, भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये त्यांचा सहभाग नव्हता, अशीही माहिती आहे. तसेच पायलट मोहना सिंग यांचाही फोटो व्हायरल करण्यात येत आहे. मात्र, यापैकी कुणीही एअर स्ट्राईकचा भाग नव्हता, हेही तितकेच खरं आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1659)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x