2 May 2024 3:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
x

निवडणुकीत ‘मोदी मंत्र’ कुचकामी हे कार्यकर्त्यांना ठाऊक, पण ते बोलू शकत नाहीत: भाजप नेते संघप्रिय गौतम

भोपाळ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना उपपंतप्रधान पद द्यावे. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना युपीच्या मुख्यमंत्रिपदी बसवा आणि एमपी’चे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे भाजपचं राष्ट्रीय अध्यक्ष पद द्या, असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते संघप्रिय गौतम यांनी पक्षाला दिला आहे. त्याचबरोबर पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केवळ राज्यसभेवरच लक्ष द्यावं असे मत व्यक्त केले आहे.

तसेच युपीचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना थेट धार्मिक कार्यास पाठवले पाहिजे, असे सुद्धा त्यांनी माध्यमांनसमोर बोलताना मत व्यक्त केले. सध्या विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वांत मोठे नेते आहेत. पण २०१९ मध्ये ‘मोदी लाट’ असण्याबाबत शंका आहे असे ते म्हणाले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत ‘मोदी मंत्र’ कामी येईल असे वाटत नाही असं ते म्हणले. वास्तविक पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही हे मान्य आहे, परंतु ते बोलू शकत नाहीत.

सध्या मोदी सरकारच्या धोरणांविरोधात सामन्यांमध्ये प्रचंड राग पसरला आहे. तसेच परिस्थिती इतकी वाईट आहे की, जर आता निवडणुका झाला तर भारतीय जनता पक्ष काही ठराविक राज्य वगळता इतर सर्व राज्यांमधून सत्तेबाहेर फेकली जाईल, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. तसेच योजना आयोगाचे नाव बदलणे, CBI, RBIच्या कार्यात केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाबाबत सांगत गौतम यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यशैलीवर प्रचंड टीका केली.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x