27 June 2022 1:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Labour Code | कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 4 दिवस काम, 3 दिवस विश्रांती | 1 जुलैपासून नियमांची अंमलबजावणी होणार? Maharashtra Political Crisis | महाविकास आघाडी सरकार अल्पमतात | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास भाजपाचा पॉलिटिकल प्लॅन तयार Zomato Share Price | झोमॅटोच्या शेअरमध्ये गुंतवणूक करा | 100 टक्के मल्टिबॅगर रिटर्न कमाई होईल नवाब मलिक मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी नव्हते | संजय दत्त होता | भाजपच्या स्क्रिप्टवर शिंदेंच्या जनतेला टोप्या Aadhaar Card | तुमच्या आधार कार्डशी संबंधित हे काम 3 दिवसांत करा | अन्यथा मोठे नुकसान होईल Investment Planning | एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये तुम्हाला दुप्पट फायदे मिळतील | पॉलिसीचे तपशील जाणून घ्या
x

ओपिनियन पोल: छत्तीसगड, राजस्थान व मध्य प्रदेशात भाजप जोरदार धक्का बसणार?

नवी दिल्ली : या वर्षाअखेर छत्तीसगड, राजस्थान व मध्य प्रदेश या तीन राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहेत. या तिन्ही राज्यात सध्या भाजपचे सरकार असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसून काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एबीपी न्यूज आणि सी व्होटरनं एकत्रित केलेल्या या सर्वेक्षणात प्रथम दर्शनी हे निकाल दिसत आहेत. त्यानुसार लोकसभा निवडणुकीआधी भाजपला धक्का बसण्याची शक्यता असल्याचे या सर्वेक्षणात दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या तिन्ही राज्यातील मतदार काँग्रेसला हात देण्याची शक्यता शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या ओपिनियन पोल नुसार मध्यप्रदेशात भाजपला ४० टक्के तर दुसरीकडे काँग्रेसला ४२ टक्के मतं मिळण्याचा अंदाज दर्शविण्यात आला आहे. मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण २३० जागांपैकी ११७ जागा काँग्रेसला तर भाजपला १०६ जागांचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवराज सिंह चौहान यांना धक्का बसण्याच भाकीत या ओपिनियन पोलमध्ये दिसत आहे.

दुसरीकडे छत्तीसगडमधील रमण सिंह यांच्या नैतृत्वाला देखील आगामी विधानसभा निवडणुकीत धक्का बसून काँग्रेस सत्तेत येईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार काँग्रेसला ४० टक्के मतं तर भाजपला ३९ मतं आणि इतर पक्षांना २१ टक्के मतं पडतील अंदाज वर्तविण्यात आली आहे. विधानसभेच्या एकूण ९० जागांपैकी काँग्रेसला ५४ जागा तर भाजपला ३३ जागा मिळतील, परंतु लोकसभेत मात्र छत्तीसगड भाजपला साथ देईल असा अंदाज आहे.

दुसरीकडे राजस्थानमध्ये भाजपचा धुव्वा उडण्याची शकता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत एकूण २०० जागांपैकी काँग्रेसला ५७ टक्के मतं मिळून ते १३० जागांवर विजय प्राप्त करतील. तर दुसरीकडे भाजपला ३७ टक्के मतं मिळून केवळ ५७ जागा हाताला लागतील असं अंदाज आहे. त्यामुळे या सर्वेक्षणानुसार भाजपला धोक्याचा इशारा मिळत आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1659)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x