सांगली : सध्या राज्यभर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावर सरकार आणि सरकारच्या प्रतिनिधींकडून निरनिराळी वक्तव्य समोर येत आहेत. त्यात आता शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सुद्धा राज्यातील स्थितीवर आणि मराठा आरक्षणाच्या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे माध्यमांशी संवाद साधताना विजय शिवतारे म्हणाले की, काही समाजकंटक मराठा समाजाच्या आंदोलनात घुसले आहेत. तसेच सीसीटिव्हीच्या माध्यमातून असे कोण लोक आहेत, याचा शोध सुद्धा पोलिसांकडून सुरु असल्याच त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर निश्चित पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जाईल.
तसेच मराठा समाजाच्या आरक्षणा संबंधित सरकारच्या भूमिकेविषयी शिवतारे यांना विचारले असता ते म्हणाले की,’आरक्षणाच्या अनुषंगाने ज्या सवलती मिळणार आहेत, त्या राज्य सरकारने मराठा समाजाला देऊ केल्या आहेत. परंतु मूळ आरक्षणाचा विषय सरकारच्या हातात राहिलेला नाही. आणि ते मिळण्यास काहीसा वेळ लागेल. पण, आरक्षण मिळेल अशी आशावादी टिपणी सुद्धा दिली.
एकूणच सरकार कडून स्पष्ट आणि सरकार मराठा आरक्षणाच्या विषयावर नक्की काय हालचाली किंवा प्रामाणिक प्रयत्न करत आहे हे अजून समजलं नाही. केवळ वरवरची उत्तर देऊन वेळ काढण्याची काम सर्वच बाजूने सुरु असल्याचं आंदोलकांच मत झालं आहे. त्यामुळे सरकार नक्की काय जाहीर भूमिका घेणार ते पाहावं लागणार आहे.
