17 November 2019 9:24 PM
अँप डाउनलोड

राज्याच आर्थिक गणित बिघडलं, खर्च चालवायचा कसा ?

मुंबई : राज्याच आर्थिक गणित बिघडण्याच कारण आहे राज्यात झालेला अपुरा पाऊस, उद्योगधंद्यात अपेक्षित अशी वाढ झाली नाही, कर्जाचा वाढता बोजा आणि उत्पन्नाची मुबलक साधणं हे आर्थिक पाहणी अहवालात स्पष्ट झाल आहे.

राज्याच्या उत्पन्नाची मर्यादित साधणं असल्याने उत्पन्नापेक्षा खर्च वाढत आहे. त्यामुळे तिजोरीत पैसेच नसताना राज्याचा गाडा हाकताना पैशाचं सोंग आणायचं तरी कस असा प्रश्न राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पडला आहे.

सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि उद्या विधिमंडळात महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याचाच भाग म्हणून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी विधिमंडळात आज आर्थिक पाहणी अहवाल सादर केला त्यात हे स्पष्ट झालं आहे की राज्याचं उत्पन्न २,४३,००० कोटी असून त्या विरुद्ध खर्च मात्र २,४८,००० कोटीवर गेला आहे. राज्याची एकूण वित्तीय तूट ४५११कोटी इतकी गेली आहे.

आर्थिक पाहणी अहवालातील काही महत्वाचे मुद्दे:

१. एकूण कर्ज ४,१२,००० कोटी
२. वित्तीय तूट ४५०० कोटी
३. आर्थिक करवसुलीतील तूट ३५,००० कोटी
४. कमी पावसाने उद्योगात मंदी
५. कमी पावसाने कृषी उत्पन्नात घट
६. गेल्यावर्षी पेक्षा विकासदर २.७ टक्के घसरला
७. एकूण विकास दरात गेल्यावर्षीच तुलनेत ७.३ वाढ अपेक्षित

हॅशटॅग्स

#Maharashtra Budget Session 2018(1)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या