27 July 2024 10:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

घरगुती क्लासेस घेणाऱ्यांना जीएसटी लागू करण्याचा मसुदा तयार ?

मुंबई : घरगुती शिकवण्या घेणाऱ्यांना जीएसटी लागू करण्याचा मसुदा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी तयार करून ते मोठे क्लासेस म्हणजे महेश ट्युटोरियल आणि तत्सम क्लासेसची सुपारी घेतल्यासारखेच आहे असा थेट आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या मुलांना मोठ्या क्लासेसमध्ये टाकावे या साठीच हा सरकारचा सगळा आटापिटा असल्याचा थेट आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

नेमके आक्षेप काय आहेत ?

घरगुती शिकवण्या घेणाऱ्यांना ५% अधिभार, आयकर आणि जीएसटी तसेच सरकारकडे नोंदणी करणे आवश्यक करण्याच्या प्रस्तावाचा मसुदा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी तयार केला आहे. तसेच समाजात पुन्हा विषमता निर्माण करण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे.

मुळात घरगुती शिकवण्या घेणाऱ्या या बहुसंख्य महिला असतात. त्या त्यांच्या शिक्षणाला साजेशी आणि घराच्या आसपास नोकरी मिळत नसल्याने किंव्हा बाळंतपण आणि नोकरी सोडलेल्यामुळे अशा वैयक्तिक कारणामुळे बहुतेक महिला वर्ग घरगुती शिकवण्या घेण्याचा मार्ग स्वीकारतात.

घराला आणि संसाराला थोडा आर्थिक हातभार लागावा हा मुळात त्या घरगुती शिकवण्यामागचा मूळ उद्देश असतो. त्यांच्याकडे शिकवण्या घेणारे विद्यार्थी सुद्धा कनिष्ठ किव्हा मध्यमवर्गीय कुटुंबातले असतात कारण त्यांना महागड्या कोचिंग क्लासेसची महागडी फी सुध्दा परवडणारी नसते. या घरगुती शिकवण्यातून मिळणार उत्पन्न ही खूप नसतं आणि अशा घरगुती शिकवण्या म्हणजे एक ज्ञानदानाचं काम आहे. परंतु अनेक कर या छोट्या घरगुती शिकवण्यांवर लादून त्यांना संपवण्याचा घाट सरकारने घातल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

इतकेच नाही तर केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षात शिक्षणावरचा खर्च दरवर्षी कमी कमी केला आहे.

हॅशटॅग्स

#Jitendra Awhad(40)#Vinod Tawde(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x