26 May 2022 7:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

मेरठमध्ये संघाचं जोरदार शक्तिप्रदर्शन.

मेरठ : मेरठमध्ये संघाने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. कारण होत संघाचं राष्ट्रोदय संमेलन जे मेरठ मध्ये पार पडलं. उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये पार पडलेल्या या राष्ट्रोदय संमेलनाला संघाचे जवळपास तीन लाख स्वयंसेवक उपस्थित होते अस संघाच्या प्रतिनिधींनी प्रसारमाध्यमांना कळवलं.

संघाचं राष्ट्रोदय संमेलन मेरठमध्ये आयोजित करण्यात आले आहे. त्यात भाजपचे अनेक मंत्री आणि नेते संघाच्या या राष्ट्रोदय संमेलनाला उपस्थित आहेत. आता सरसंघचालक मोहन भागवत या संमेलनात स्वयंसेवकांना काय मार्गदर्शन करणार याकडेच सर्वांचे लक्ष्य आहे.

नव्या पिढीच्या स्वयंसेवकांकडे पोहोचता यावे म्हणून हे राष्ट्रोदय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. परंतु सरसंघचालकांच्या लष्करासंबंधातील विधानाने देशभरात संतापाची लाट आली होती. त्यामुळेच आता स्वयंसेवकांना संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार याकडेच सर्वांचे लक्ष आहे.

हॅशटॅग्स

#Mohan Bhagwat(8)#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x