5 August 2021 3:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
माविआ कधीही पडेल, राज्यपाल अत्यंत निष्ठावंत व कर्तृत्ववान | त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने राग - अमृता फडणवीस पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय Special Recipe | सोपी कृती आणि कमी साहित्यात बनवा चटकदार भडंग - पहा रेसिपी उच्चांकी महागाईत अमृता फडणवीस यांचा पुणेकरांना अजब सल्ला | कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा युवासेनेत मोठे फेरबदल होणार | प्रथमच ठाकरे आडनावाबाहेरील व्यक्ती थेट युवासेना प्रमुख बनणार? - सविस्तर वृत्त Special Recipe | रुचकर पनीर पराठा रेसिपी नक्की ट्राय करा उत्तर प्रदेश निवडणुक २०२२ | प्रियांका गांधी यांच्यासंबंधित 'तो' जुना सल्ला काँग्रेस आता गांभीर्याने घेणार?
x

केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र बाकी सगळे इंद्र | फक्त आरोप आणि टीका एवढेच त्यांचे काम - भास्कर जाधव

Shivsena MLA Bhaskar Jadhav

रत्नागिरी, २५ जून | राज्यातील नेत्यांना सातत्याने त्रास देण्याचे काम भाजप करत आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाला संपवण्याचा विडा भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी उचलला आहे. असा घणाघात शिवसेना प्रवक्ते तथा आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. ते आज खेडमधील कोरेगाव येथे कोविड सेंटरच्या उद्घाटनाला आले असताना बोलत होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भाजपचे सुडाचे राजकारण सुरू आहे:
2019 मध्ये भारतीय जनता पार्टीला सत्ता स्थापन करण्यात अपयश आले, तेव्हापासून भाजपचा सुडाच्या राजकारणाचा प्रवास सुरू झाला आहे. गेल्या 2 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीची कृती, ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला संपवण्याचीच आहे, आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे महाराष्ट्रातील भाजपचे नेते आहेत. अनिल देशमुख असतील, अनिल परब असतील, किंवा भाजपच्या कार्यकारिणी मिटिंगमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ईडीने चौकशी करावी अशा पद्धतीचा ठराव होतो. भुजबळ साहेबांनी नुसते मत प्रदर्शित केले तर त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगतात तुम्ही जामिनावर सुटलेला आहात, जपून बोला याचा अर्थ केंद्रातील सत्तेचा दुरूपयोग हा मराठी माणसाला संपवण्यासाठी भाजप करत असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला.

याचाच परिपाक म्हणजे या रेड आहेत:
राज्यातील नेत्यांना सातत्याने त्रास देण्याचे काम भाजप करत आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाला संपवण्याचा विडा भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी उचलला आहे, आणि त्याचाच परिपाक म्हणजेच अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्या घरावर सातत्याने होणाऱ्या रेड आहेत. असे ते म्हणाले. याचा मी जाहीर निषेध करत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी फक्त टीका करावी:
केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र बाकी सगळे इंद्र, आणि तोच प्रकार आज देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत सातत्याने घडतोय, त्यांनी फक्त टीका करावी, आरोप करावेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि संस्काराला काळिमा फासण्याचे काम करावे एवढेच त्यांचे काम सुरू आहे. असा आरोप त्यांनी यावेळी केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Shivsena MLA Bhaskar Jadhav criticized opposition leader Devendra Fadnavis news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1125)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x