23 April 2024 1:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत खरेदी करा 30 शेअर्स, हे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करू शकतात Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, नेमकं कारण काय? Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, सकारात्मक अपडेटने स्टॉक सुसाट धावणार SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची विशेष योजना, दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल 80,000 रुपयांचा परतावा
x

लिकर किंगशी कनेक्शन? | अवैध दारूसाठा विखे-पाटलांच्या कारखान्यातून आल्याचा संशय

Nashik, liquor king Atul Madan, BJP leader Radhakrishna Vikhe Patil

नाशिक, ४ डिसेंबर: सध्या फरार असलेला नाशिकचा लिकर किंग अतुल मदन प्रकरणात राधाकृष्ण विखे-पाटील (liquor king Atul Madan connection with BJP leader Radhakrishna Vikhe Patil) अडचणीत येण्याची शक्यता आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध मद्यसाठा जप्त केला होता. हा मद्यसाठा लिकर किंग अतुल मदनच्या वाईन शॉपमध्ये जात असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अतुल मदन याचे नाशिकमधील 14 वाईन शॉप सील करण्यात आले होते. हा मद्यसाठा विठ्ठलराव विखे-पाटील कारखान्यातून आल्याचा संशय उत्पादन शुल्क विभागाला आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या संशयानुसार आता विठ्ठलराव विखे-पाटील कारखान्यातील दारुचे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे (Forensic Science Laboratory) पाठवण्यात आले आहेत. नाशिक ग्रामीण पोलिसांनी जप्त केलेला दारु साठा आणि विठ्ठलराव विखे पाटील कारखान्यातील दारुचे नमुने यात साधर्म्य आढळल्यास उत्पादन शुल्क विभाग विखे पाटील कारखान्याच्या मालकांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचेचे मोठे नेते गिरीश महाजन यांचं नाव नाशिकच्या बीएचआर घोटाळ्यात आलं आहे. तर आता अवैध मद्यसाठा प्रकरणी विखे पाटील यांचं नाव समोर येत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचेचे दोन मोठे नेते अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नेमकं प्रकरणं काय?
सर्वसामान्यांना किरकोळ गुन्ह्यांसाठी खाक्या दाखवणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाने, लिकर किंग अतुल मदनचे शहरातील तब्बल 14 दारु दुकानं सील केल्यानंतर देखील त्याला अटक न केल्याने शहरात उलटसुलट चर्चा होऊ लागल्या. तीन दिवसांपूर्वीच ग्रामीण पोलिसांनी अवैध मद्यसाठा करणारा ट्रक पकडल्यानंतर हा प्रकार समोर आला होता.

ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी गेल्या आठवड्यात नाशिक हद्दीत पशू खाद्याच्या ट्रकमधून जाणारा अवैध मद्यसाठा पकडला होता. विशेष म्हणजे लाखो रुपयांचा हा मद्यसाठा शहरातील एकाच दारु दुकान मालकाच्या दुकानांमध्ये जात होता. नाशिकच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी केलेल्या कारवाईने अवैध मद्यविक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या प्रकरणाची सखोल चौकशी करुन लिकर किंग अतुल मदनच्या मालकीच्या 14 दारु दुकानांना सील करत धडक कारवाई केली होती. दरम्यान, एकीकडे ग्रामीण पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांनी थेट कारवाई केलेली असताना, उत्पादन शुल्क विभाग मात्र, अतुल मदन यांच्याकडून खुलासा आल्यानंतर अटक करु, अशा डिफेनसिव्ह मोडमध्ये का आहे, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

 

News English Summary: Radhakrishna Vikhe-Patil (liquor king Atul Madan connection with BJP leader Radhakrishna Vikhe Patil) is likely to get into trouble in the case of fugitive Nashik liquor king Atul Madan. Nashik Rural Police had seized a large quantity of illegal liquor. It was revealed that the liquor was going to the wine shop of Liquor King Atul Madan. Atul Madan’s 14 wine shops in Nashik were sealed after the order of Nashik District Collector. The excise department suspects that the stock of liquor came from Vitthalrao Vikhe-Patil factory.

News English Title: Nashik liquor king Atul Madan connection with BJP leader Radhakrishna Vikhe Patil News updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x