13 May 2021 3:20 AM
अँप डाउनलोड

एक शरद सर्व गारद मुलाखतीनंतर उद्धव ठाकरे यांची 'दिल की बात'

Shivsena MP Sanjay Raut, Facebook Post, CM Uddhav Thackeray

मुंबई, २० जुलै : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिलकी बात राजकारण ढवळून काढेल. कोरोनापासून राम मंदिरापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दणक्यात बोलले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत सामनासाठी घेतली आहे. सगळ्याच प्रश्नांना दिलखुलास उत्तरं मिळाली आहे. ही मुलाखत २५ आणि २६ जुलै अशी दोन भागांमध्ये पाहता येणार आहे अशी फेसबुक पोस्ट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत सामनासाठी घेतली. सर्वच प्रश्नांना दिलखुलास उत्तरे मिळाली. ऊध्दव ठाकरे यांची ‘दिल की बात’ राजकारण ढवळून काढेल. कोरोनापासून ते राम मंदिरापर्यंत मुख्यमंत्री ठाकरे दणक्यात बोलले, असे राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच, ही मुलाखतही शरद पवार यांच्या मुलाखतीप्रमाणेच विविध टप्प्यात पाहता येणार आहे. याच महिन्यातील २५ आणि २६ जुलै रोजी ही मुलाखत वाचता व पाहता येईल, असे राऊत यांनी आपल्या ट्विटरवरुन म्हटले आहे.

मागील आठवड्यातच संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. त्यामध्ये शरद पवार यांनी करोना प्रश्न, महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग, चीनचा पश्न आदी विषयांवर सविस्तर भाष्य केलं होतं.

 

News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray was interviewed for the match. All the questions were answered heartily. Uddhav Thackeray’s ‘Dil Ki Baat’ will stir up politics. From Corona to Ram Mandir, Chief Minister Thackeray spoke in a bang, Raut said in his tweet.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut Facebook Post About CM Uddhav Thackeray News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SanjayRaut(8)#UddhavThackeray(378)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x