28 March 2023 7:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Saving Account | एका व्यक्तीला बँक सेविंग अकाऊंटची मर्यादा किती आहे? हे नियम लक्षात ठेवा अन्यथा नुकसान Minimum Salary of EPF | तुमचा किमान पगार किती आहे? कारण पेन्शनची रक्कम वाढणार, नवा प्लॅन लक्षात ठेवा Business Idea | कधीही बंद न पडणाऱ्या या व्यवसायात उतराल तर मोठी कमाई कराल, सरकारी मदत सुद्धा मिळतेय Horoscope Today | 29 मार्च 2023 | 12 राशींमध्ये बुधवारचा दिवस कोणासाठी कसा असेल? पहा तुमचं बुधवारचं राशीभविष्य Balkrishna Industries Share Price | पैसाच पैसा! या शेअरने गुंतवणुकदारांना 41,664% परतावा देत करोडपती बनवलं, स्टॉक बद्दल जाणून घ्या Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! या 11 शेअर्सनी फक्त 1 महिन्यात 164 टक्क्यांपर्यंत परतावा दिला, शेअर्सची किंमतही कमी Numerology Horoscope | 29 मार्च, तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
x

मी पाहिलेल्या शहरांमध्ये डोंबिवली हे सर्वाधिक घाणेरडं शहर : गडकरी

डोंबिवली : डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थान आणि नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने विद्यार्थी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवादाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

त्याच संवादा दरम्यान उत्तर देताना विकासाच्या मुद्याला धरून गडकरी असे म्हणाले की, डोंबिवली हे माझ्या पाहण्यातलं घाणेरडं शहर असून इकडे घाण, अनधिकृत बांधकाम आणि अरुंद रस्ते हेच त्याला कारणीभूत असून ते इथल्याच लोकप्रधिनिधींच्या आशीर्वादाने होत आहे असे सांगून स्वपक्षीय नेत्यांचेच कान उपटले.

एका विद्यार्थ्याने गडकरींना प्रश्न केला की, आमचं डोंबिवली शहर मुंबईच्या इतके जवळ असताना शहराचा विकास का खुंटला आहे ? इथे भविष्यात येऊ घातलेले प्रकल्प मार्गी का लागत नाहीत ? असे प्रश्न गडकरींना विचारले असता त्या उत्तराची सुरुवातच करताना डोंबिवली हे माझ्या पाहण्यातलं एक घाणेरडे शहर असल्याचा उल्लेख केला.

पुढे नितीन गडकरी असं ही म्हणाले की, डोबिवलीतील लोकं इतकी चांगली आहेत, पण घाण, अरुंद रस्ते आणि अनधिकृत बांधकाम यामुळे शहर बकाल झाले असून त्याला स्थानिक लोकप्रधिनिधींचाच आशीर्वाद असल्याचे गडकरी म्हणाले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना उलट प्रश्न केला की, जे प्रतिनिधी शहराचा विकास करू शकत नाहीत त्यांना निवडूनच का देता असे म्हणत ही लोकांचीच चूक असल्याचे गडकरी चर्चे दरम्यान म्हणाले.

नागपूरच्या विकास कामांचं उदाहरण देताना नितीन गडकरी म्हणाले की नागपुरातील रस्ता रुंद करण्यासाठी मी माझ्या सासऱ्यांच घर पाडलं होत. त्यानंतर मला सुद्धा घरात बायकोची नाराजी सोसावी लागली होती. त्यामुळे विकास कामात आणि विशेष करून रस्ता रुंदीकरणात बऱ्याच मालमत्तांवर बुलडोझर फिरवताना अनेकदा हितसंबंध दुखावले जातात, परंतु विकास हा आवश्यक आहे असे गडकरी उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले.

मुळात कल्याण-डोंबिवलीत भाजप- शिवसेनेची सत्ता असल्याने गडकरींनी केलेल्या या विधानाने डोंबिवलीतील भाजप शिवसेना नेत्यांना खळबळ माजली आहे. तर डोंबिवली शहराला एक घाणेरड शहर असं वक्तव्य केल्याने डोंबिवलीकरांचा स्वाभिमान दुखावला गेल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे. त्यातच भाजपचे स्थानिक आमदार रवींद्र कदम हे राज्य मंत्रिमंडळात असल्याने गडकरींच्या स्पष्ट वक्तेपणाने त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा स्थानिक राजकारणात चालू झाली आहे. तरी शहराच्या विद्रूपीकरणात लोकांची काहीच चूक नसून गडकरींनी आधी स्वपक्षीय नेत्यांना कामाचे धडे द्यावेत अशी संतप्त प्रतिक्रिया सामान्य डोंबिवलीकर देत आहेत.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x