17 April 2021 11:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
लस घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज असल्याने विषाणूचा फार वाईट परिणाम होणार नाही - डॉ. गुलेरिया पियुष गोयल महाराष्ट्रातून राज्यसभेवर | पण संकटात महाराष्ट्रावर निर्लज्ज राजकारणाचा आरोप राज्यावर कोरोना संकट | राष्ट्रवादीच्या आमदाराने उभारलं ११०० बेडचं कोविड सेंटर | १०० बेड्सना ऑक्सिजन सुविधा देशभरात रुग्णांना रेमडेसीवीर नाही, ऑक्सीजन नाही, अंत्यसंस्कारासाठी रांगा तरी मोदी निवडणुकीच्या प्रचारात कोरोनाची तिसरी लाट कधीही उसळेल | उद्धव ठाकरेंचं उद्योगांना नियोजनपूर्वक सज्ज राहण्याचं आवाहन तुम्ही 'प्रधान कोवइडियट' आणि सुपर स्प्रेडर आहात | देशाच्या इतिहासातील सर्वात निर्लज्ज पंतप्रधान - काँग्रेस नेत्याची टीका मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन-रेमडेसिवीर संदर्भात मोदींना कॉल केला | पण ते प्रचारात आहेत असं उत्तर मिळालं
x

बुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानच्या माजी पंतप्रधानांना पुरस्कार | राऊतांची टीका

Shivsena MP Sanjay Raut, BJP, Shinzo Abe, Padma Vibhushan

नवी दिल्ली, २६ जानेवारी: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच काल (२५ जानेवारी) केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात ७ जणांचा पद्म विभूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. १० नामवंत व्यक्तींना पद्मभूषण तर १०२ जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. पद्म पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील ७ नामवंत व्यक्तींचा समावेश आहे. यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत २९ महिला, १० विदेशातील नागरिक तर एका ट्रान्सजेंडर व्यक्तीचा समावेश आहे. एकूण १६ महान व्यक्तींना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पद्म विभूषण:
1. शिंजो आबे, सार्वजनिक क्षेत्र, जापान
2. एस. पी. बालसुब्रमण्यम (मरणोत्तर), कला, तामिळनाडू
3. डॉ. बेल्ले मोनाप्पा हेगडे, औषननिर्माण, कर्नाटक
4. नरेंद्र सिंग कंपनी (मरणोत्तर), विज्ञान आणि अभियांत्रिकी, अमेरिका
5. मौलाना वहिदुद्दीन खान, अध्यात्म, दिल्ली
6. बी. बी. लाल, पुरातत्व, दिल्ली
7. सुदर्शन साहू, कला, ओडीशा

दरम्यान, याच विषयाला अनुसरून शिवसेना खासदार मोदी सरकारवर टीका सुद्धा सुरु झाली आहे. ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाले ते काबिल असतील. त्यांचं मी स्वागत करतो, असं सांगतानाच बुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म पुरस्कार देण्यात आला असावा, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी पद्म पुरस्कारावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाले ते काबिल असतील. त्यांचं मी स्वागत करतो, अशी खोचक टीका राऊत यांनी केली. इतकं मोठं राज्य आहे. त्यात इतके लोक काम करतात. पण महाराष्ट्रातील केवळ 6 लोकांना पुरस्कार देण्यात आला आहे. इतर राज्यातील नावं पाहिली आहे. राज्यातील 10 ते 12 लोकांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यता येतो. यंदा फक्त सहाच जणांना पुरस्कार देता? ही नावं पाहून मला आश्चर्य वाटलं, असं संजय राऊत म्हणाले.

 

News English Summary: MP Sanjay Raut has attacked the Modi government over the Padma award. Those who received the Padma Shri award will be eligible. I welcome him, said Raut. There is such a big state. So many people work in it. But only 6 people from Maharashtra have been awarded. I have seen the names of other states. The award is given annually to 10 to 12 people in the state. Give awards to only six people this year? I was surprised to see these names, said Sanjay Raut.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut taunt BJP over Shinzo Abe awarded Padma Vibhushan news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(212)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x