12 December 2024 8:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

४० शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचा कंपनीवर आरोप | त्याच उद्योजकाला पद्मभूषण

Congress, Sachin Sawant, Padma Bhushan Award, Industrialist Rajnikant Shroff

मुंबई, २६ जानेवारी: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच काल (२५ जानेवारी) केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात ७ जणांचा पद्म विभूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. १० नामवंत व्यक्तींना पद्मभूषण तर १०२ जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. पद्म पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील ७ नामवंत व्यक्तींचा समावेश आहे. यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत २९ महिला, १० विदेशातील नागरिक तर एका ट्रान्सजेंडर व्यक्तीचा समावेश आहे. एकूण १६ महान व्यक्तींना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

पद्मभूषण
8. कृष्णन नायर शांताकुमारी चित्रा , कला, केरळ
9. तरुण गोगोई (मरणोत्तर), सार्वजनिक क्षेत्र, आसाम
10. चंद्रशेखर कांब्रा, साहित्य आणि शिक्षण, कर्नाटक
11. सुमित्रा महाजन, सार्वजनिक क्षेत्र, मध्य प्रदेश
12. नृपेंद्र मिश्रा, सिव्हिल सर्व्हिस, उत्तर प्रदेश
13. राम विलास पासवान (मरणोत्तर), सार्वजनिक क्षेत्र, बिहार
14. केशुभाई पटेल (मरणोत्तर), सार्वजनिक क्षेत्र, गुजरात
15. कालबे सादिक (मरणोत्तर), अध्यात्म, उत्तर प्रदेश
16. रजनीकांत देविदास श्रॉफ, ट्रेड अॅन्ड इंडस्ट्री, महाराष्ट्र
17. तारलोचन सिंग, सार्वजनिक क्षेत्र, हरियाणा

दरम्यान, पद्म पुरस्कारावरून आरोप-प्रत्यारोप होणे नवे नाही. यंदाचं वर्षही यास अपवाद नसून काँग्रेसनं केंद्रातील सत्ताधारी भाजपवर पहिला वार केला आहे. प्रसिद्ध उद्योजक रजनीकांत श्रॉफ यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल काँग्रेसनं आश्चर्य व्यक्त केलं आहे.

त्यालाच अनुसरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या संदर्भात एप्रिल २०१९ चे आपले जुने ट्वीट शेअर केले आहेत. रजनीकांत श्रॉफ हे युनायटेड फॉस्फरस लिमिटेड (यूपीएल) या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. विदर्भातील ४० शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी यूपीएल ही कंपनी जबाबदार असल्याचा आरोप या कंपनीवर झाला होता. याच कंपनीच्या मुख्यालयात भारतीय जनता पक्षाचे प्रचार साहित्य बेकायदेशीररित्या बनवण्यात आले होते, असा आरोपही कंपनीवर झाला होता. सचिन सावंत यांनी जुने ट्वीट शेअर करून याची आठवण करून दिली आहे.

‘यूपीएल कंपनीला मुंबई महापालिकेनं देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं ४,५०० कोटींचं कंत्राट देण्यात आलं होतं. मात्र, भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर हे कंपनीचे पेमेंट थांबवण्यात आले होते. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महापालिका आयुक्तांशी बोलून हे पेमेंट व्हावे, यासाठी प्रयत्न केले होते. सत्ताधारी भाजपनंही या प्रकरणात मध्यस्थी केली होती. भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय काकडे हे देखील या प्रकल्पात भागीदार आहेत. इतकेच नव्हे, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे बंधू प्रदीप गोयल हे या कंपनीच्या संचालक मंडळामध्ये आहेत. यूपीएल कंपनीचे भाजपशी असलेले संबंध स्पष्ट करण्यासाठी हे पुरेसं आहे,’ असं सावंत यांनी त्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

News English Summary: Accordingly, Maharashtra Congress spokesperson Sachin Sawant has shared his old tweets of April 2019 in this regard. Rajinikanth Shroff is the Managing Director of United Phosphorus Limited (UPL). The company was accused of being responsible for the suicides of 40 farmers in Vidarbha. The company was also accused of illegally producing BJP’s propaganda material at the company’s headquarters. Sachin Sawant has reminded this by sharing an old tweet.

News English Title: Congress leader Sachin Sawant reaction on Padma Bhushan Award to industrialist Rajnikant Shroff news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x