मनसेतून भाजपात थेट विरोधी पक्षनेते पदी गेलेले दरेकर म्हणतात | हा महिला शिवसैनिकांवर अन्याय
मुंबई, १ डिसेंबर: राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार आणि प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi), महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले.
पक्षप्रवेशानंतर दुपारी पत्रकार परिषद घेऊन अनेक गौप्यस्फोट करणार असल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं आहे. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त जागेवर शिवसेनेनं उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी देण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वत: त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर उर्मिला यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कालच या चर्चेला दुजोरा दिला होता. त्यानुसार आज दुपारी उर्मिला मुख्यमंंत्र्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी पोहोचल्या. तिथं त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
दरम्यान, “पक्षात कोणाला प्रवेश द्यायचा हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु, प्रवेश देत असताना उर्मिला मातोंडकर यांच्या प्रवेशाने महिला आघाडी मजबूत होईल, अशा प्रकारच वक्तव्य करणं म्हणजे आदरणीय बाळासाहेबांनी रणरागिणी म्हणून शिवसेनेच्या महिलां कार्यकर्त्यांना जी उपमा दिली आणि ज्या रस्त्यावर आंदोलनात आघाडीवर असायच्या, तसेच ज्यांनी घर दाराची पर्वा न करता शिवसेनेच्या वाढीसाठी लढवैय्या कार्यकर्ता म्हणून काम केले, त्यांच्या कामावर पाणी फेरण्याचा प्रकार आहे”, असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडल. Opposition Leader Pravind Darekar criticized Shivsena over Urmila matondkar joing party.
“शिवसेनेच बदलते स्वरुप दिसत आहे. त्यांनी प्रियांका चतुर्वेदी यांना खासदार केले आणि आज ज्या राज्यातील सत्तेत काँग्रेस आहे, त्या काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवेलेल्या उमेदवाराला आज पक्षात प्रवेश दिला जातो आहे”, असा खोचक टोमणाही त्यांनी हाणला. शिवसेनेची मूळ विचारधारा, आज यापलीकडे जाऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन केवळ सत्तेच्या समीकरणाभोवती शिवसेनेचे (Shivsena, NCP and Congress Mahavikas Aghadi) राजकारण फिरताना दिसत आहे”, असं म्हणत दरेकरांवर शिवसेनेवर टीका केली.
News English Summary: Shiv Sena candidate for the Legislative Council and eminent actress Urmila Matondkar officially joined the Shiv Sena on ‘Matoshree’ from the quota of MLAs appointed by the Governor. In the presence of Shiv Sena chief and Chief Minister Uddhav Thackeray, Environment Minister Aditya Thackeray, Rajya Sabha MP Priyanka Chaturvedi, Mayor Kishori Pednekar, Mrs. Chief Minister Rashmi Thackeray tied the Shivbandhan in Urmila’s hands.
News English Title: Actress Urmila Matondkar officially joined the Shivsena after getting the MLAs appointed by the Governor quota News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News