18 September 2021 10:02 PM
अँप डाउनलोड

गुजरात विधानसभेत काँग्रेसच्या आमदाराचा भाजप आमदाराला चोप

अहमदाबाद : गुजरात विधानसभेत राडा झाल्याचे वृत्त ए.एन.आय दिले असून त्यात भाजपच्या एका आमदाराला काँग्रेसच्या आमदाराने भर विधानसभेत चोप दिल्याचे वृत्त दिले आहे. गुजरातच्या विधानसभेत बुधवारी काँग्रेस आमदारांनी प्रचंड गदारोळ घातला होता.

BhagyaVivah Marathi Matrimonial

काँग्रेसचे गोंधळ घालणारे आमदार एवढ्यावरच थांबले नाही तर त्यात त्यांनी भाजपच्या एका आमदारालाही भर विधासभेतच चोप दिला आहे. आम्हाला सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा आक्षेप काँग्रेसने घेतला होता. परंतु विधानसभेचे अध्यक्ष भाजप आमदारांना झुकते माप देत असल्याच्या कारणा वरून विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला होता. त्यानंतर अध्यक्षांनी काँग्रेसच्या १५ आमदारांवर निलंबनाची कारवाई केली होती आणि त्यांना सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले होते.

निलंबन झाल्यानंतर काँग्रेसचे नेते अमित चवडा यांनी सभागृहाची जाहीर माफी मागितल्यानंतर आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले होते. त्यानंतर गुजरातचे कृषिमंत्री आरसी फाल्दू त्यांच्या खात्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी करत असताना काँग्रेस आमदारांनी पुन्हा गोंधळाला सुरुवात केली. त्यावेळी भाजपचे काही आमदार बोलण्यासाठी उभे राहिले असताना काँग्रेसच्या आमदारांनी त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळी भाजपचे आमदार जगदीश पांचाल यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान काँग्रेस आमदार प्रताप दुधात यांनी जगदीश पांचाल यांना पट्याने मारहाण केली. एवढेच नाही तर काँग्रेस आमदारांनी सभागृहातील माईकची सुद्धा तोडफोड केल्याचे वृत्त आहे.

हॅशटॅग्स

#Gujarat Assembly(2)#Narendra Modi(1650)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x