19 August 2022 5:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Group Stocks | टाटा समूहच्या या शेअर्सनी गुंतवणूक दुप्पट केली, पुढे आणखी वाढण्याची शक्यता, खरेदीचा सल्ला Viral Video | जगातील सर्वात तरुण फिनलँडच्या महिला पंतप्रधान सना मरिन यांचा पार्टीत दारू पिऊन गोंधळ, व्हिडिओ व्हायरल Atmanirbhar Bharat Failure | आत्मनिर्भर भारत फक्त मार्केटिंग घोषणा?, देशातील 15% पेक्षा जास्त आयात चीन'मधून होते आहे Lenovo Legion Y70 | लेनोवोने लीजन वाय 70 स्मार्टफोन लाँच केला, 16 जीबी रॅम आणि अनेक फीचर्स जाणून घ्या PMVVY Scheme | विवाहित जोडप्यांना दरमहा 18500 रुपये मिळण्याची गॅरंटी, 100% सुरक्षित सरकारी योजना जाणून घ्या Tatkal Passport Service | काय आहे तात्काळ पासपोर्ट सेवा, कसा करावा ऑनलाइन अर्ज, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया IRCTC Ticket Booking | रेल्वेनं लाँच केलं अ‍ॅप, रांगेत उभे न राहता स्टेशनच्या 5 किमी अंतरात तिकीट बुक करा
x

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांची हकालपट्टी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांची ट्रम्प प्रशासनाने हकालपट्टी केली असून तसे अधिकृत ट्विट करून खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यांच्या जागी सीआयएचे अध्यक्ष माईक पॉम्पीओ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रेक्स टिलरसन यांच्यात अनेक दिवस काही विषयांवरून एकवाक्यता नव्हती. तसेच या वादाचेच पडसाद म्हणून त्यांना एक्झॉन मोबील सारख्या महाकाय तेल कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आमच्यात एकवाक्यता नव्हती याची कबुली सुद्धा स्वतः ट्रम्प यांनी जाहीरपणे बोलून दाखवली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकृत ट्विट अकाउंट वरून त्यांनी अशी माहिती दिली आहे कि, सीआयएचे अध्यक्ष माईक पॉम्पीओ हे अमेरिकेचे नवनियुक्त परराष्टमंत्री असतील. माईक पॉम्पिओ हे चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली असून रेक्स टिलरसन यांनी दिलेल्या सेवेबद्दल सुद्धा आभार प्रकट केले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जीना हास्पेल यांची सीआयएच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिला अमेरिकन महिला ठरल्या आहेत.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x