23 May 2022 11:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Paytm Share Price | पेटीएमचा शेअर 130 टक्के परतावा देऊ शकतो | रेकॉर्ड हायपासून खरेदीला स्वस्त Multibagger Stock | अदानी ग्रुपच्या या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 1 कोटी केले | स्टॉकबद्दल जाणून घ्या Stocks To Buy | या 5 शेअर्समधून मिळेल मजबूत नफा | 60 टक्क्यांपर्यंत बंपर रिटर्न्स कमाईची संधी Swing Trading Stocks | या आठवड्यातील स्विंग ट्रेडिंगसाठी टॉप शेअर्स हे आहेत | नफ्याच्या शेअर्सची यादी Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा Stocks To Buy Today | या 5 शेअर्समधून 1 आठवड्यात कमाईची मोठी संधी | ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला Investment Planning | मुलांच्या चांगल्या आर्थिक भविष्यासाठी हे आहेत तुमच्या फायद्याचे पर्याय
x

'वॉलमार्ट' एक लाख कोटींना ‘फ्लिपकार्ट’ला विकत घेणार?

मुंबई : भारतातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी ‘फ्लिपकार्ट ऑनलाइन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ आपले ७५ टक्के समभाग महाकाय कंपनी ‘वॉलमार्ट’ला विकण्याची शक्यता आहे आणि तशी फ्लिपकार्टने तयारी दर्शविली आहे.

फ्लिपकार्ट आणि वॉलमार्ट मधील हा व्यवहार एक लाख ३१८ कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे. या व्यवहारामागचे प्रमुख कारण वॉलमार्ट’ने जगभरात विस्तार करणे असे कारण दिले असले तरी मुख्य कारण हे अमेझॉनचा जगभरात होत असलेला विस्तार असल्याचे बोलले जात आहे.

फ्लिपकार्टमध्ये जपानच्या सॉफ्टबँक समूहाची गुंतवणूक असून ते आपली २० टक्के हिस्सेदारी सुद्धा या व्यवहारात विकणार आहेत. ‘गूगल’ची उपकंपनी अल्फाबेट सुद्धा या व्यवहारात सामील असणार आहे. फ्लिपकार्ट ऑनलाइन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक मंडळाने समभागविक्रीस मान्यता दिल्याने अॅमेझॉन’ला भारतात आणि जगभरात तगडं आवाहन दिल जाणार आहे.

वॉलमार्ट’चा मूळ उद्देश सर्वात मोठी भारतीय बाजारपेठ काबीज करणे व अॅमेझॉन’ला मोठे आव्हान निर्माण करणे हे आहे. लवकरच संपूर्ण व्यवहार आणि त्यामागचे आकडे समोर येतील.

हॅशटॅग्स

#Flipkart(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x