27 July 2024 10:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

भाजपच्या फायद्यासाठीच छगन भुजबळ बाहेर: राज ठाकरे

अंबरनाथ : छगन भुजबळ ह्यांना भाजपने स्वतःच्या फायद्यासाठी बाहेर काढलं हे जनतेला लवकर समजेलच असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. एनसीपीचे जज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना आधीच जमीन मिळायला हवा होता, परंतु भाजपने त्याला जाणीवपूर्वक उशीर केला असा आरोप करत राज ठाकरे यांनी पुढे सांगितलं की,’भाजपच्या फायद्यासाठीच छगन भुजबळ बाहेर काढण्यात आलं असून ते जनतेला लवकरच समजेल’.

भुजबळांवर झालेल्या आरोपांची चौकशी केली जाईलच, व त्यात ते दोषी आढळले, तर त्यांना शिक्षा देखील होईल. परंतु कोर्टाने सांगितल्यानंतरही त्यांना दोन वर्षे जामीन मिळतच नव्हता जे चुकीचे आहे असं सुद्धा राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

अंबरनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी हे विधान केलं आहे. विशेष महाजन छगन भुजबळ यांना जामीन मंजूर होताच समाज माध्यमांवर ‘ओबीसी’च्या मुद्याने पुन्हां उचल घेतली असून त्यामागे निव्वळ योगायोग नसावा असं राजकीय जाणकार बोलत आहेत.

भाजपचं राजकारण चुकीचं असून, भाजपला सुद्धा एक्सपायरी डेट आहेच असा टोलाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x