3 July 2020 3:38 PM
अँप डाउनलोड

अखेर श्रीपाद छिंदम १५ दिवसांसाठी नगर मधून तडीपार

नगर : संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमला अहमदनगर जिल्ह्यातून १५ दिवसांसाठी तडीपार करण्यात आले आहे. श्रीपाद छिंदमला महाराष्ट्रातूनच कायमचा हद्दपार करा या मागणीसाठी उद्या अहमदनगरमध्ये शिवप्रेमींच्या नैतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार असल्यामुळे खबरदारी म्हणून श्रीपाद छिंदमला १५ दिवसांसाठी नगर मधून तडीपार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी श्रीपाद छिंदमवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु नंतर जामिनावर बाहेर आला आहे. श्रीपाद छिंदमला महाराष्ट्रातूनच कायमचा हद्दपार करा या मागणीसाठी उद्या सकाळी अहमदनगरमध्ये शिवप्रेमींच्या नैतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा शिवाजी महाराज पुतळ्यापासून हा मोर्चा सुरू होणार असून तो माळीवाडा वेस, पंचपीर चावडी, माणिक चौक, भिंगारवाला चौक, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रोडमार्गे चौपाटी कारंजा असा प्रवास करणार आहे. शिवप्रेमींच्या नैतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार असल्यामुळे खबरदारी म्हणून श्रीपाद छिंदमला १५ दिवसांसाठी नगर मधून तडीपार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Shripad Chindam(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x