12 April 2021 5:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

युतीच्या सत्ताकाळात सुद्धा भाजप-शिवसेना नेत्यांचे असे पक्ष प्रवेश व्हायचे - अंकुश काकडे

NCP Party Ankush Kakde, Shivsena 5 corporators, MahaVikasAghadi

पुणे, ५ जुलै : महाविकासआघाडीमध्ये सुरू असलेल्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीकाल भेट घेतली होती.
लॉकडाऊनबाबत प्रशासनातील अधिकारी मंत्र्यांशी चर्चा न करताच निर्णय घेत असल्याची तक्रार महाविकासआघाडीच्या नेत्यांची आहे. लॉकडाऊनचा निर्णयही परस्पर जाहीर करण्यात आल्यामुळे मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. त्यासंदर्भात पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मुंबईतील जुन्या महापौर बंगल्यावर बैठक झाली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मात्र काल चक्क शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पारनेरच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदार लंके यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. याशिवाय शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला.

येत्या काही महिन्यांत नगरपंचायतीची निवडणूक होणार असल्याने आमदार लंके यांनी सुरू केलेली ही तयारी असल्याचे सांगण्यात येते. तालुक्याचे आमदार असले तरी शहरावरही वर्चस्व असले पाहिजे, हाच त्यांचा हेतू आहे. अशाच पद्धतीने जामखेडमध्येही तेथील नगरपालिकेची सत्ता ताब्यात घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना काही दिवसांपूर्वीच यश आले आहे. फरक एवढाच की जामखेडला भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. तर पारनेरला राज्यातील सत्तेत एकत्र नांदणाऱ्या शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीत आले आहेत.

दरम्यान, यावरून शिवसेनेच्या गोटात संताप व्यक्त करण्यात आला मात्र त्याची खुलेआम प्रतिक्रिया महाविकास आघाडी असल्याने टाळल्याचं पाहायला मिळालं. मात्र राष्ट्रवादीच्या गोटात आनंद पाहायला मिळाला, दरम्यान यावर राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते अंकुश काकडे म्हणाले की युती काळात देखील सत्तेत एकत्र असताना शिवसेना आणि भाजपचे नेते तसेच पदाधिकारी एकमेकांच्या पक्षात प्रवेश करतंच होते. एकप्रकारे असे प्रकार भविष्यात देखील होण्याची शक्यता या विधानावरून दिसत असल्याचं राजकीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे. यावरून महाविकास आघाडीचे आमदार देखील भाजपच्या संपर्कात असू शकतात अशी शंका देखील यावरून केली जाऊ लागली आहे.

 

News English Summary: 5 Shiv Sena corporators joined NCP. Parner’s Shiv Sena corporators had joined the party in the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar. Corporator Dr. Muddassir Syed, Nandkumar Deshmukh, Kisan Gandhade, Vaishali Auti, Nanda Deshmane have joined the NCP and accepted the leadership of MLA Lanka.

News English Title: NCP Party leader Ankush Kakde reply on Shivsena 5 corporators joining NCP party News latest Updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1074)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x