25 June 2022 1:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
भाजपच्या सांगण्यावरून शिंदेंचा समर्थक आमदारांनाविरुद्धही गेम प्लॅन | सेनेतच असल्याचं सांगून भीषण प्लॅन रचला आहे Maharashtra Political Crisis | शिंदे गटातील 10 बंडखोर आमदार पवारांच्या संपर्कात | गुवाहाटीत धाकधूक वाढली MPSC Recruitment Updates | एमपीएससी अभ्यासक्रम बदलणार | मुख्य परीक्षेत मोठे बदल होणार SBI Share Price | एसबीआय शेअर 673 रुपयांच्या पार जाणार | तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला ठाण्याचा रिक्षाला आज करोडपती झालाय | त्यांच्या गावात गावकऱ्यांसाठी सोयी सुविधा नाहीत, पण स्वतःसाठी 2 हेलिपॅड 1 July Changes | 1 जुलैपासून तुमच्यावर थेट परिणाम करतील हे बदल | त्रास टाळण्यासाठी अधिक जाणून घ्या Hero Passion XTec | हिरोने लाँच केली नवी पॅशन एक्सटेक बाईक | जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
x

राम मंदिर मुद्दा: २ निवडणुकीतील शिवसेनेची दुटप्पी भूमिका लवकरच उघड करणार

मुंबई : सध्या देशात भाजप आणि शिवसेनेच्या राजवटीत महागाईने शिखर गाठलं असताना शेतकरी आत्महत्या, जलयुक्त शिवार आणि शिवजल योजनांचं ग्रामीण भागाला मृगजळ दाखवून पुन्हा तीव्र दुष्काळ जाहीर करण्याची आलेली वेळ, पेट्रोल-डिझेलचे वाढणारे भाव, डॉलरच्या तुलनेत कोसळणारी रुपयाची किंमत या सर्व विषयांपासून सामान्य लोकांना विचलित करण्यासाठी सगळं ठरवून सुरु आहे अशी परिस्थिती आहे.

कारण, २०१९ च्या निवडणूका ना भाजपला पोषक दिसत आहेत आणि नाही शिवसेनेला सुद्धा. दरम्यान २०१४ मध्ये विकासाची स्वप्नं दाखवत सत्तेत आलेल्या भाजप आणि शिवसेनेचा विकासाचा कार्यक्रम पूर्ण फसल्याने भाजप आणि शिवसेनेने धार्मिक राजकारण सुरु करून राम मंदिराच्या नावाने बोंब सुरु केली आहे. त्यात शिवसेनेच्या डझनभर मंत्र्यांनी नेमका काय विकास केला आणि ते राज्यातील जनतेसाठी किती विकासाची कामं करतात याची पोलखोल त्यांच्याच आमदाराने सर्वांदेखत केली आहे. त्यामुळे राम मंदिराची निवडणुकीपूर्वी सर्वाधिक घाई शिवसेनेला होणे साहजिकच आहे.

त्यामुळे राम मंदिराच्याबाबत २ वेगवेगळ्या निवडणुकीतील शिवसेनेची दुप्पटी भूमिका त्यांच्या तत्कालीन प्रतिक्रियेसोबत आम्ही लवकरच उघड करणार आहोत. त्यामुळे आता २०१९ मधील लोकसभा निवडणूका जवळ येताच राम मंदिर हा सर्वाधिक महत्वाचा मुद्दा बनवणारी शिवसेना, त्यावेळी राम मंदीराच्या मुद्याला बगल देत कोणते इतर मुद्दे अधिक महत्वाचे आहेत हे प्रसार माध्यमांना पटवून देत होते ते समोर येणं काळाची गरज आहे.

त्यामुळे नव्या पिढीला त्या दुटप्पी भूमिके विषयी सर्व माहिती करून देणे गरजेचे आहे. दरम्यान, आज राम मंदिर हा सर्वाधिक महत्वाचा मुद्दा वाटत असलेल्या शिवसेनेची तत्कालीन भूमिका तरुणांना समजने गरजेचे आहे. त्यामुळे त्याचा व्हिडिओ पुराव्यासकट आम्ही खुलासा करणार आहोत.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x