16 December 2024 1:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

शिंदे गटाच्या कृषी मंत्र्यांचं भीषण वक्तव्य, सुप्रिया सुळे भिकारXX नेत्या' म्हणत अत्यंत हीन दर्जाचा शब्द प्रयोग, संतापाची लाट

Abdul Sattar

Minister Abdul Sattar | शिवसेनेविरोधात केलेल्या बंडखोरीनंतर शिंदे गटावर सातत्यानं ५० खोके घेतल्याचा आरोप केला जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही टीका केली होती. सुप्रिया सुळेंच्या टीकेला राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अर्वाच्य उत्तर दिलंय. त्यामुळे सत्तार पुन्हा एकदा वादात सापडलेत.

शिवसेनेत झालेलं बंड आणि त्यानंतर घडलेलं सत्तांतर याचे पडसाद अजूनही राज्यात उमटताहेत. बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी गुवाहाटीला जाण्यासाठी ५० कोटी म्हणजे ५० खोके घेतल्याचा आरोप सातत्यानं विरोधकांकडून केला जातोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार हा आरोप होतोय.

बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची पुन्हा एकदा जीभ घसरली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे भिकारXX नेत्या’ अशी टीकाच सत्तार यांनी केली. सत्तार यांच्या विधानामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे. श्रीकांत शिंदे यांच्या सिल्लोडमध्ये होणाऱ्या जाहीर सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आलेल्या अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद आणि सिल्लोड दौऱ्यावर जोरदार टीका केली. यावेळी बोलत असताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर देताना अपशब्द वापरले.

तसंच, ‘सगळं वाहून गेल्यानंतर दौरे करताय जेव्हा सत्ता होती तेव्हा कुठे होते. इतकच नाही तर आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी साफसफाई करण्यापासून खुर्च्याही आम्ही दिल्या आता माणसंही आम्ही द्यायचे का असा खोचक टोलाही सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या वक्तव्याचे निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यात येणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: State Agriculture minister Abdul Sattar tongue slipped abusive language used against MP Supriya Sule check details 07 November 2022.

हॅशटॅग्स

#Abdul Sattar(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x