4 May 2024 10:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Bogus Caste Certificate Case | नवनीत राणा विरोधात वॉरंट प्रकरणी फडणवीसांकडील पोलीस खातं मॅनेज? न्यायाधीशांना पोलिस खात्यावर शंका

Bogus Caste Certificate Case

Bogus Caste Certificate Case | अमरावतीच्या खासदार या ना त्या प्रकरणामुळे कायम चर्चेत असतात. अशातच बोगस जात पडताळणी प्रकरणामध्ये नवनीत राणा यांच्या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू आहे. यावेळी ‘कारवाई का होत नाही? आरोपी महाराष्ट्रातच आहे? पोलीस मॅनेज झाले का?’ असं म्हणत न्यायाधीशांनी पोलिसांना झापून काढलं. खासदार नवनीत राणा यांचं बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने पोलिसांना खडेबोल सुनावले.

बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आलं आहे. परंतु तरीही पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यानं त्यांच्यावर कारवाई का केला नाही?, आरोपी महाराष्ट्रातच आहे ना?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत न्यायालयानं पोलिसांना धारेवर धरलं आहे. काही दिवसांपूर्वीच बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयानं मुलुंड पोलिसांना कारवाईचे करण्याचे निर्देश दिले होते.

परंतु याचिकाकर्ते जयंत वंजारी यांनी कोर्टात धाव घेत खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली जात नसल्याचं कोर्टाच्या लक्षात आणून दिलं. त्यानंतर कोर्टानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना खडेबोल सुनावले आहेत. मुलुंड पोलिसांनी राणा यांच्यावर कारवाई करण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता. परंतु त्याला कोर्टानं नकार देत पुढील सुनावणी येत्या २८ नोव्हेंबरला घेण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळं आता खासदार नवनीत राणा यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bogus Caste Certificate Case Mumbai magistrate court slams police over not taking action against MP Navneet Rana 07 November 2022.

हॅशटॅग्स

#Bogus Caste Certificate Case(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x