5 May 2024 11:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी
x

Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर सुसाट धावतोय, हा शेअर अल्पावधीत पैसे गुणाकारात वाढवतोय

Piccadily Agro Share Price

Piccadily Agro Share Price | पिकाडली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. पिकाडली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनी जगातील सर्वात प्रसिद्ध इंद्री ही सिंगल माल्ट व्हिस्की बनवणारी कंपनी आहे. मागील काही वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ( पिकाडली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनी अंश )

10 एप्रिल 2024 रोजी ज्या गुंतवणूकदारांनी पिकाडली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य अवघ्या 15 दिवसात 1,50,000 रुपये झाले आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 82 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी पिकाडली ॲग्रो इंडस्ट्रीज स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 576.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

पिकाडली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मागील 8 दिवसापासून 5 टक्के अप्पर सर्किट हीट करत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5,180 कोटी रुपये आहे. पिकाडली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीने नुकताच आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. मार्च तिमाही निकालानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मार्च 2024 तिमाहीत पिकाडली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीचा निव्वळ नफा जवळपास चार पट अधिक वाढला आहे.

पिकाडली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीने QIP द्वारे 1,000 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मागील अडीच वर्षांत इंद्री ब्रँडच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. इंद्री सिंगल माल्ट व्हिस्कीला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. इन्द्री ब्रँडने भारतातील एकूण व्हिस्की मार्केटचा 30 टक्के वाटा काबीज केला आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये इन्द्री ब्रँड लॉन्च झाल्यानंतर त्याच्या मागणीत 7 पट वाढ झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Piccadily Agro Share Price NSE Live 25 April 2024.

हॅशटॅग्स

Piccadily Agro Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x