10 August 2020 8:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कोरोनाचे संकट संपताच महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल, कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले अमेरिकेत शाळा उघडल्या | ९७ हजार मुलांना कोरोनाची लागण | जुलैमध्ये २५ मुलांचा मृत्यू युरोपियन देशांप्रमाणे मुंबईत आवाजाचा नुमना घेऊन कोविड -19 टेस्ट करण्याचा प्रयोग नाणार प्रकल्प | गुलाबराव पाटील यांची खासदार नारायण राणे यांच्यावर बोचरी टीका सुशांत प्रकरण | आदित्य ठाकरेंविरोधात पुन्हा ट्विटरवर जोरदार अभियान | हजारो ट्विट्स राज्यात भाजपचं सरकार आल्यावर आपला उदय झाला, तत्पूर्वीचे आपले महान कार्य राज्यापुढे नाही भाजपच्या पाठिंब्यावर उभ्या राहिलेल्या वृत्तवाहिनीतून सुशांत प्रकरणात आघाडी उघडली
x

पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहा: भाजप आ. जयकुमार रावल

BJP MLA Jaykumar Raval, BJP Dhule, Maharashtra Assembly Election 2019

धुळे: राज्यात युतीचे सरकार स्थापन होण्याआधीच दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील नेते एकमेकावर दबावतंत्र अवलंबत आहेत. दरम्यान पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी तयार व्हा, असं खळबळजनक वक्तव्य पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे. धुळे शहरात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. धुळे जिल्ह्यातल्या पाच मतदारसंघांचा आढावा रावल यांनी घेतला त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. सरकार स्थापन न झाल्यास निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेश रावल यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला बहुमत दिले असले तरी भारतीय जनता पक्ष-सेनेमध्ये सत्तेचा तिढा सुटता सुटत नाही आहे. एका बाजुने सेना आणि आघाडीचे नेते भूमिका मांडत असताना भारतीय जनता पक्षाने मात्र ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पर्यटन विकास त्री जयकुमार रावळ यांनी पुन्हा विधानसभा निवडणुकीची भाषा करत शिवसेनेच्या नकारघंटेला उत्तर दिले आहे. जयकुमार रावळ यांनी कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आदेश दिले आहे. शिवसेनेच्या ताठर भूमिकेला भाजपचे उत्तर देताना या निवडणुकीत थोड्या फरकाने हरलेल्या सर्व जागा जिंकणार असल्याचे रावळ यांनी वक्तव्य केले आहे.

त्यांनी धुळ्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत रावल यांनी निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, काही जागा थोड्या कमी फरकाने हरल्या आहेत. या सर्व जागा पुन्हा जिंकू असा निर्धार करा असा आदेश कार्यकर्त्यांना दिला. शिवसेनेची ताठर भूमिका कायम राहिल्यास राज्यात पुन्हा निवडणुका होण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितले. धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघ आहे. या पाचपैकी ४ जागांवर भारतीय जनता पक्षाने निवडणुका लढविल्या आहेत. यात धुळे ग्रामीण, साक्री येथील जागा भारतीय जनता पक्ष कमी फरकाने पराभूत झाली आहे. जिल्ह्यात पाचही जागा लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. निवडणुका पुन्हा झाल्यातर आमची लढण्याची तयारीही आहे असं जयकुमार रावल यांनी सांगितले. तसेच या निवडणुकीत मोठे यश मिळवून राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करणार आहोत असं बैठकीत सांगण्यात आलं.

दरम्यान, राज्यातील सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमावारी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची ते भेट घेणार असून राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कसा सोडवता येईल याबद्दल चर्चा करणार आहेत.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x