15 August 2022 12:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Xiaomi CyberOne Robot | शाओमीने तयार केला स्मार्ट रोबोट, काम करताना मनुष्याच्या भावनेनुसार विचार करू शकणार Multibagger Mutual Funds | या 3 जबरदस्त मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना लक्षात ठेवा, SIP ने 3 वर्षात लाखोंचा फायदा Horoscope Today | 15 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 2023 Kia Ray | 2023 किआ रे कार लाँच, जबरदस्त लूकसह मिळणार शानदार असे फीचर्स Viral Video | तो बाईक सहित खड्ड्यात पडला की खड्ड्यातून वर आला?, विचित्र अपघाताचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय अमित शहांनी फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनवलं | तर फडणवीसांनी मुनगंटीवार आणि चंद्रकांतदादांचं राजकीय वजन घटवलं शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचं खातेवाटप | दादा भुसेंकडून कृषी खातं सत्तारांकडे, शिंदेंकडून मूळ शिवसैनिकांना हलकी खाती
x

अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी मनसे आ. राजू पाटील यांच्याकडून अडीच लाखांची मदत

MNS MLA Raju Patil, donated fund, Ayodhya Ram temple nirman

कल्याण, २३ जानेवारी: राम मंदिर निर्माणाची तयारी सध्या जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिर निर्माण करणारी संस्थेचे L&T आणि टाटा कन्सल्टन्सी यांच्या इंजिनियर्स सोबत बैठक पार पडली होती. त्यानंतर २१-२२ जानेवारीला राम मंदिर निर्माण समितीची देखील बैठक पार पडणार होती. यावेळी मंदिर कामकाजाची समीक्षा आणि मंदिराच्या डिझाईनच्या अंतिम स्वरुप त्याला मंजुरी देण्यासाठी जलद काम करण्यात येणार आहे.

पौराणिक पद्धतीने भव्य अशा राम मंदिराचा निर्माण करण्यात येणार आहे. दरम्यान एकीकडे मंदिर मनाची तयारी सुरू असताना दुसरीकडे देशभर राम मंदिर निर्माणासाठी वर्गणी जमा करण्यात येत आहे. यामध्ये मोठ्या सेलिब्रेटिंग बरोबरच सामान्या राम भक्तांकडून देखील वर्गणी जमा करण्यात येत आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी राम मंदिरासाठी 2 लाख 51 हजार रुपयांचा धनादेश मदत म्हणून दिला आहे. राम मंदिर उभारण्याच्या या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य प्राप्त झाले, असे म्हणात राजू पाटील यांनी स्वत: आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबतची माहिती दिली आहे.

आज जगभरातील सकल हिंदू समाज एकवटून अयोध्येतील ‘श्रीराम मंदिर निर्माण निधी’ संकलन करून यथाशक्ती योगदान देत आहे. काल मला पण या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य प्राप्त झाले,” असे राजू पाटील ट्विटरवर म्हणाले. याचबरोबर, “गणेश मंदिर ट्रस्टी अच्युत कराडकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कल्याण जिल्हाप्रमुख अण्णा गाणार, संघ कार्यकर्ते उदय कुलकर्णी, सुरेश फाटक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला आणि प्रभू श्रीराम मंदिराची छोटी प्रतिकृती भेट दिली”, असेही ट्विट राजू पाटील यांनी केले आहे.

 

News English Summary: Raju Patil, MLA of Kalyan Gramin of Maharashtra Navnirman Sena has given a check of Rs. Raju Patil himself shared the news on his official Twitter account, saying that Khari was fortunate enough to take part in this sacred work of building a Ram temple.

News English Title: MNS MLA Raju Patil donated 2 and half Lakh for Ayodhya Ram temple nirman news updates.

हॅशटॅग्स

#RamMandir(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x