29 September 2020 3:09 AM
अँप डाउनलोड

राज-पवारांच्या विमान प्रवासावर टीका, आज उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील एकाच गाडीने प्रवास

नाशिक : शिवसेना दिल्ली ते गल्ली भाजपसोबत सत्तेत बसून राज्यात तब्बल १२ मंत्रिपद उपभोगत आहे आणि केंद्रात एक कॅबिनेट मंत्रिपद आहे. परंतु, स्वबळाचा नारा देताना शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली ते गल्लीपर्यंत भाजपच्या नेत्यांवर टीका आणि आगपाखड करण्याची एकही संधी सोडत नाहीत. परंतु आज नाशिक दौऱ्यावर आलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांनी चक्क महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास केला. त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर सुद्धा गाडीत होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही नेत्यांच्या वेगवेगळ्या गाड्यांचा ताफा सोबत असताना दोघांनी स्वतःच्या गाड्यांचा ताफा सोडून दुसऱ्याच गाडीतून एकत्र प्रवास केला. त्यामुळे युतीचं पहिल पाऊल नाशिकमध्ये पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांच्या विकासकामांचं नाशिकमध्ये उद्घाटन करण्यासाठी ते नाशिक दौर्यावर आले होते. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील स्वतःचे खासगी गाड्यांचे ताफे सोडून दुसऱ्याच गाडीत एकत्र का बसले अशी चर्चा रंगली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी औरंगाबादवरुन मुंबईकडे परतताना एकाच विमानाने प्रवास केला होता. त्यावेळी त्यांच्या मनोमिलनाच्या बातम्या पसरल्या होत्या. त्यामुळे आजच्या उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या एकाच गाडीतून प्रवास करण्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या निवडणुकीआधी मनोमिलनाच्या चर्चा रंगल्या आहेत.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(294)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x