28 September 2020 8:53 PM
अँप डाउनलोड

मध्य प्रदेश निवडणूक; मुख्यमंत्र्यांचे मेहुणे काँग्रेसमध्ये दाखल

इंदूर : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे निकटवर्तीय आणि मेहुणे संजय सिंह यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. शनिवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के कमलनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत संजय सिंह यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान, के कमलनाथ मध्य प्रदेशात जोमाने पक्ष कामाला लागले असून काँग्रेससाठी सध्या मध्य प्रदेशात पोषक वातावरण आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, भाजपचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे कुटुंबीयच भाजपसोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करू लागल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच आयोजित पत्रकार परिषदेत संजय सिंह यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी आता के कमलनाथ यांच्यासाठी खेळी सुरु केली आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना संजय सिंह म्हणाले की, मध्य प्रदेशात आता शिवराज नाही तर कमलनाथ यांची गरज अधिक आहे. आता शिवराज यांचे राज भरपूर झाले. त्यांनी तब्बल १३ वर्षे राज्याची सत्ता सांभाळली. परंतु, आता के कमलनाथ यांना संधी मिळाली पाहिजे.

तसेच राज्यात गुंतवणूकदारांच्या अनेक बैठका पार पडल्या मात्र त्याचा जराही फायदा झाला नाही. आज मध्य प्रदेशात अनेक तरुण बेरोजगार आहेत. के कमलनाथ यांनी छिंदवाडा भागात केलेली विकास कामे सर्वश्रुत आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशातील सामान्य माणूस के कमलनाथ यांची आतुरतेने वाट पाहत आहेत, असे सुद्धा संजय सिंह यांनी सांगितले. दरम्यान, के कमलनाथ म्हणाले की, ज्याप्रमाने संजय सिंह यांनी भाजपमध्ये निष्ठेने सेवा केली तशीच ते काँग्रेसमध्ये सुद्धा करतील, अशी आशा व्यक्त केली.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1321)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x