21 May 2024 1:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा, अशी संधी सोडू नका Infosys Share Price | कमाईची संधी सोडू नका! Infosys आणि TCS सहित हे 7 शेअर्स मजबूत परतावा देणार Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा
x

अमित शहांना आवाहन; आपच्या आणि भाजपच्या विकास कामांची चर्चा रामलीला मैदानावर होऊन जाऊ दे

नवी दिल्ली : आपचे नेते तसेच दिल्ली’चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विकास कामांच्या मुद्यावरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट रामलीला मैदानावर खुल्या चर्चेचे आवाहन दिल आहे. देशातील पूर्वांचलच्या भागात विकासासाठी मोदी सरकारने काय केले याचा हिशेब रामलीला मैदानावरील पूर्वांचल महाकुंभामध्ये अमित शहांनी मांडला होता त्याला केजरीवाल यांनी खुलं आवाहन देत, तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं याची खुली चर्चा होऊन जाऊ दे असं म्हटलं आहे.

दरम्यान, वित्त आयोगाच्या अंतर्गत मिळणाऱ्या निधीवर बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, काँग्रेस सरकारने १३ व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत पूर्वांचलच्या विकासासाठी केवळ ४ लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. तर नरेंद्र मोदी सरकारने मात्र १४ व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत ही रक्कम जवळपास तिप्पट करुन १३ लाख ८० हजार कोटी रुपयांचा निधी पूर्वांचलसाठी दिला असा दावा शहांनी केला होता. नेमका याच मुद्याचा आधार घेत १४ व्या वित्त आयोगांतर्गत दिल्लीला केवळ ३२५ कोटी रुपयांचा निधी का दिला, असा प्रश्न केजरीवाल यांनी अमित शहां पुढे उपस्थित केला आहे.

त्यानंतर ज्या विकासाचा धिंडोरा भाजपला वाजवला आहे, त्याच भाजपच्या विकासाला केजरीवाल यांनी खुलं आवाहन देत आप’ने केलेली विकास कामं आणि भाजपने केलेली विकास कामं यावर रामलीला मैदानावर खुली चर्चा करण्याचं आवाहन त्यांनी अमित शहा यांना दिल आहे.

ट्विट’वर भाजपने केजरीवाल यांना उत्तर दिल आहे की,’केजरीवालजी, या ४ वर्षांत तुम्ही दिल्लीकरांसाठी काय काम केले? दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा एकच मूलमंत्र आहे. खोटे बोलणे आणि वारंवार रेटून खोटे बोलणे,’ असे टिष्ट्वट भाजपने केले होते. तर भाजपला प्रत्युत्तर देताना केजरीवालांनी आरोग्य, शिक्षण, वीज-पाणी या क्षेत्रात आप’च्या सरकारने केलेल्या मूलभूत कामांचा दाखला दिला आहे. तसेच आपच्या या कामांची प्रशंसा जागतिक स्तरावरही होत असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x