21 November 2019 7:23 AM
अँप डाउनलोड

अजून एका गुजराती व्यापाऱ्याचा देशाला ५,००० कोटीचा चुना आणि देशाबाहेर पलायन

नवी दिल्ली : हिरा व्यापारी नीरव मोदी, मेहुल चोक्सी, कनिष्क प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मालक भूपेश कुमार जैन आणि आता अजून एक गुजराती व्यापारी देशाला ५ हजार कोटीचा चुना लावून देशाबाहेर पळाला आहे. नितीन संदेसरा असे पळालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून तो नायजेरियात पळाला असल्याची माहिती समोर येत आहे. गुजरातमधील स्टर्लिंग बायोटेक कंपनीचा मालक नितीन संदेसरा, त्याचा भाऊ चेतन संदेसरा, भावजयी दिप्तीबेन संदेसरा आणि कुटुंबातील अन्य सदस्य नायजेरियात लपल्याची माहिती आहे.

सध्या भारत आणि नायजेरिया या दोन देशांदरम्यान कोणताही अधिकृत प्रत्यार्पण करार नसल्याने नितीन संदेसराला भारतात परत आणणे खूप कठीण असल्याचं सुरक्षा यंत्रणांना वाटत आहे. मागच्या महिन्यात म्हणजे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात नितीनला दुबईतून ताब्यात घेतल्याचे वृत्त पसरले होते. परंतु, ती माहिती खोटी असून ताब्यात घेण्याआधीच नितीन आणि संपूर्ण परिवार नायजेरियात पळून गेला असावा, असा अंदाज आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने प्रसार माध्यमांना दिली आहे.

भले मोठे घोटाळे केल्यानंतर नेमकं कोणत्या देशात पळून जावं आणि कोणत्या देशांदरम्यान भारताचे प्रत्यार्पण करार नाहीत याची जणू यादीच या घोटाळेबाजांकडे असावी असं एकूण चित्र आहे. आधीच भारतीय व्यवस्था अडचणीत आहे आणि बँकिंग व्यवस्थेतील बुडीत कर्जाची वाढत जाणारी आकडेवारी विचार करायला लावत आहे आणि त्यात हे एकामागे एक न थांबणारे घोटाळे यामुळे सर्वच कठीण होऊन बसलं आहे.

सीबीआय तसेच अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडी ने स्टर्लिंग बायोटिकचे गुंतवणूकदार नितीन, चेतन आणि दिप्ती संदेसरा, राजभूषण ओमप्रकाश दीक्षित, विलास जोशी, चार्टर्ड अकाउंटंट हेमंत हठी, आंध्र बँकेंचे माजी संचालक अनुप गर्ग आणि अन्य काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे असं वृत्त आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1044)BJP(415)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या