राज्य सरकारकडून नवीन नियमावली; मॉल्स, दुकानं, मैदानं, रिक्षा-टॅक्सीबाबत हे नियम
मुंबई, १९ मे: देशातील कोरोनाबाधित रुग्णाने लाखाची संख्या ओलांडली आहे. आरोग्य मंत्र्यालयाने सकाळी दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या एक लाख एक हजार १३९ झाली आहे. मागील २४ तासांत ४९७० नवीन करोनाग्रस्त आढळले तर १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठ दिवसातील कोरोनाग्रस्त विदेशातून आलेले किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरातून गाव-खेड्यात पोहलले रूग्ण आहेत. स्थलांतरामुळे शहरातील कोरोना गाव खेड्यात पोहचल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे राज्यात सोमवारी करोनाचे आणखी २,०३३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या ३५,०५८ वर पोहोचली. राज्यात सोमवारी ५१ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या १,२४९ वर पोहोचली. राज्यभरात आतापर्यंत ८,४३७ रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोनाला रोखण्यासाठी देशात सध्या चौथ्या टप्प्याचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये रेड, ऑरेंज, ग्रीन आणि कन्टेंन्मेंट झोनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. यात धर्तीवर आज महाराष्ट्र सरकारच्या वतीनेही लॉकडाऊनबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ही नियमावली मुंबई, पुणे (शहर), सोलापूर (शहर), औंरंगाबाद (शहर), मालेगाव, धुळे, नाशिक (शहर), जळगाव, अकोला आणि अमरावती या भागांमध्ये लागू करण्यात येणार आहे. दरम्यान रात्री ७ ते सकाळी ७ दरम्यान कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे.
Revised Guidelines during the extended period of Lockdown for the containment of COVID-19 in the State. (2/3) pic.twitter.com/EkUjoG0kwD
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 19, 2020
अशी आहे नियमावली:
- सरकारच्या वतीनं इ-कॉमर्स (ऑनलाईन) सामनासाठी आजपासून परवानगी दिली आहे.
- रेड झोन नसलेल्या परिसरांमध्ये मैदानं, स्टेडियम, सार्वजनिक ठिकाणं सुरू करण्यात येतील. मात्र कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत.
- रेड झोनमध्ये दुकानं, मॉल्स, कारखाने खुली करण्याची परवानगी. केवळ देखभालीसाठी खुली करण्यात यावी. मात्र मॉल्समध्ये सामानांची विक्री केली जाणार नाही. ही दुकानं सकाळी ५ ते ५ पर्यंत खुली राहतील.
- रेड झोनमध्ये टॅक्सी, रिक्षा किंवा कॅबना परवानगी नाही. बस या फक्त रेड झोन नसलेल्या परिसरात चालवल्या जातील.
- रेड झोन नसलेल्या परिसरांमध्ये रिक्षांसाठी चालक वगळता केवळ २ लोकांना बसण्याची परवानगी असेल. तर, चारचाकीसाठी चालक वगळता २ लोकांना प्रवास करण्याची परवानगी असेल.
News English Summary: A fourth phase lockdown has been announced in the country to prevent corona. This lockdown includes some discounts in Red, Orange, Green and Containment Zones. On the basis of this, the Maharashtra government has also announced rules regarding lockdown.
News English Title: Maharashtra government issues revised guidelines for lockdown public transport allowed in non red zones up Covid 19 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या