15 December 2024 4:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा
x

TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त TTML शेअर पुन्हा तेजीत, खरेदीची योग्य वेळ आहे का? अपडेट जाणून घ्या

TTML Share Price

TTML Share Price | टाटा समूहाचा भाग आलेल्या टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. शुक्रवारी टीटीएमएल स्टॉक 1.43 टक्के घसरणीसह 75.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ( टीटीएमएल कंपनी अंश )

27 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 59.80 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. तर 15 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 109.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी टीटीएमएल स्टॉक 1.33 टक्के वाढीसह 76.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

25 एप्रिल 2024 रोजी टीटीएमएल कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनी आपले तिमाही निकाल जाहीर करू शकते. टीटीएमएल कंपनीने सेबीला माहिती दिली की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवार दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीचे आणि 2024-25 या आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर करू शकतात.

मार्च 2024 मध्ये टीटीएमएल कंपनीच्या प्रवर्तकांकडे कंपनीचे 74.36 टक्के भाग भांडवल होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे कंपनीचे 25.64 टक्के भाग भांडवल होते. टीटीएमएल कंपनीचे प्रवर्तक असलेल्या टाटा सन्स कंपनीकडे टीटीएमएल कंपनीचे 38,27,59,467 शेअर्स म्हणजेच 19.58 टक्के भाग भांडवल आहेत. यासह टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनीकडे टीटीएमएल कंपनीचे 94,41,74,817 शेअर्स म्हणजेच 48.30 टक्के भाग भांडवल आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price NSE Live 22 April 2024.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x