16 May 2024 3:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर

IRFC Share Price

IRFC Share Price | मागील आठवड्यात निफ्टी-50 निर्देशांक 1.2 टक्के वाढला होता. तर PSU निर्देशांकाने सर्वाधिक म्हणजेच 5.4 टक्के उसळी घेतली होती. रेल्वे कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूत वाढ पाहायला मिळत आहे. अशा तेजीच्या काळात Axis Securities फर्मने आयआरएफसी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आयआरएफसी ही कंपनी रेल्वे प्रकल्पांना वित्तपुरवठा करणारी सरकारी कंपनी आहे. ( आयआरएफसी कंपनी अंश)

शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स पुढील 30 दिवसांसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 158 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 1 वर्षात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 420 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 1.61 टक्के वाढीसह 160.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांनी आयआरएफसी स्टॉक 156-152 रुपये किमतीच्या दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 160 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 178 रुपये ही पहिली आणि 185 रुपये दुसरी टार्गेट प्राइस स्पर्श करतील. शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करताना 142 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या किंमत पातळीपेक्षा टार्गेट प्राइस 18-20 टक्के अधिक आहे.

आयआरएफसी स्टॉकने 153 रुपये किमतीवर मल्टिपल रेझिस्टन्स मोडला आहे. मागील आठवड्यात आयआरएफसी स्टॉक 158 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 193 रुपये होती. मार्च 2024 मध्ये आयआरएफसी स्टॉक 117 रुपये किमतीवर आला होता. तर एप्रिल महिन्यात या शेअर्सची नीचांक किंमत 135 रुपये होती.

2 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2024 या वर्षात आयआरएफसी स्टॉक 57 टक्के वाढला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 125 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 420 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 29 April 2024.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x