26 April 2024 6:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

'माझे कौटुंबिक मित्र वाधवान'; आरोपाखालील व्यक्तींबाबत ठाकरे सरकारमधील सचिवाकडून उल्लेख

Amitabh Gupta, Wadhawan Family

मुंबई, १० एप्रिल: लॉकडाउनची सक्तीनं अमलबजावणी केली जात असताना ‘डीएचएफएल’चे कपिल वाधवान यांच्यासह २३ जण सुटी घालवण्यासाठी महाबळेश्वरला गेल्याचं प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी दिल्याचं उघड झालं आहे. यावरून विरोधी पक्षानं सरकारला धारेवर धरताच सरकारनं अमिताभ गुप्ता यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत ट्विट करत कायदा सर्वांसाठी समान असल्याचे नमूद केले. विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. वाधवान कुटुंबातील २३ लोकांना खंडाळा ते महाबळेश्वर जाण्याची परवानगी कशी मिळाली याची चौकशी करणार आहे. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत अमिताभ गुप्तांना सक्तीच्या रजेवरच रहावे लागणार आहे.

‘पेज थ्री’ इमेज असणारे अधिकारी म्हणून अमिताभ गुप्ता यांच्याविषयी चर्चा होत असते. दिवाण बिल्डरशी संबंधित बड्या लोकांना, लॉकडाऊनदरम्यान महाबळेश्वरला जाण्याची लेखी परवानगी त्यांनीच दिल्याचं कळताच सर्वत्र खळबळ माजली आहे.

महत्वाचं म्हणजे राज्यातून कोणालाही बाहेर जायचे असेल किंवा जिल्हा बदलायचा असेल तर त्यासाठी परवानगी देण्याचे अधिकार पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांना आहेत, याची पूर्ण कल्पना अमिताभ गुप्ता यांना होती. तरीदेखील त्यांनी स्वतःच्या अधिकारात वाधवान कुटुंबीयांना परवानगी दिली. ती देत असताना त्यात त्यांनी ‘फॅमिली फ्रेंड’ आहेत असा उल्लेख केला. देश भयंकर संकटात असताना एखादा अधिकारी आपले ‘फॅमिली फ्रेंड’ आहेत म्हणून आपल्या अधिकाराचा वापर करत चुकीची सवलत देत असेल तर तो अक्षम्य गुन्हा ठरू शकतो. एवढ्या एका कारणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अमिताभ गुप्ता यांचे निलंबन करू शकतात. मात्र, संबंधित व्यावसायिकाचे भाजपच्या नेत्यांसोबत देखील चांगले संबंध असल्याचं याआधी समोर आलं आहे. मात्र भाजप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संकटात टाकण्याची संधी सोडेल असं वाटत नाही.

 

News English Summary: The important thing is that Amitabh Gupta knew full well that anyone who wants to move out of the state or change the district has the right to give permission for the police. Nevertheless, he allowed the wealthy family in their own right. While giving it, they mentioned that they had ‘family friends’. If an officer is your ‘family friend’ in a country in dire distress, using his authority to provide false relief can be an unforgivable offense. For one such reason, Chief Minister Uddhav Thackeray can suspend Amitabh Gupta. However, the concerned businessman has already come out with good relations with BJP leaders. But the BJP does not seem to give up the chance to put Uddhav Thackeray in trouble.

News English Title: Story Home Chief Secretary Amitabh Gupta favor to Wadhawan Family for travelling during Lockdown News Latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x