11 April 2021 6:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आरोग्यमंत्र्यांनी दिली लॉकडाऊनबाबत प्राथमिक माहिती | अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांकडे आंबे खाल्ल्यावर मुलं होतात असे बोलणाऱ्यांनी संकटाच्या काळात समाजाची दिशाभूल करु नये कोरोना व्हायरसची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही अधिक घातक - योगी आदित्यनाथ देशात रेमडेसिविर इंजेक्शनसाठी लोकांची वणवण | पण गुजरातमध्ये भाजप कार्यालयात स्टॉक परमबीर सिंह अडचणीत | राज्य सरकारने माजी पोलिस आयुक्तांचा तपास IPS संजय पांडेंकडे सोपवला उद्या मोदींनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यास त्यालाही फडणवीस विरोध करणार का? पंढरपूर पोटनिवडणूक | राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मनसेचा पाठिंबा | भाजपविरोधात प्रचारही करणार
x

Crime Petrol | पत्नीचा अश्लील व्हिडिओ बनवून फेसबुकवर व्हायरल केला | पुणे पोलिसात गुन्हा दाखल

Pune Police, Wife pornographic video, Facebook

मुंबई, १२ मार्च: पत्नीचा अश्लील व्हिडिओ बनवून एका व्यक्तीने सोशल मीडियावर प्रसारीत केल्याची धक्कादायक महिती समोर आली आहे. ही घटना पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Husband made a pornographic video of his wife and made it viral on Facebook)

BhagyaVivah Marathi Matrimonial

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला अनेक दिवसांपासून पतीपासून विभक्त राहत होती. दरम्यान, शेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत या महिलेचे प्रेमसंबंध जुळले होते. याचाच गैरफायदा घेत या महिलेच्या पतीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिचा अश्लील व्हिडिओ बनविला. त्यानंतर त्याने फेसबूकवर बनावट खाते बनवून पत्नीचा अश्लील व्हिडिओदेखील प्रसारित केल्याचे समोर आले आहे.

संबधित महिला पुण्यातील ताडीवाला रस्ता परिसरात राहत आहे. तिच्या पतीला दारूचे व्यसन होते. एवढेच नव्हेतर, दारू पिऊन घरी आल्यानंतर तो किरकोळ कारणांवरून तिला मारहाण करायचा. या त्रासाला वैतागून तिने 2015 मध्ये पतीपासून विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ती आपल्या आई-वडिलांसह राहत आहे. मात्र, त्या ठिकाणी राहत असलेल्या एका तरूणाशी तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, या महिलेला प्रियकरासह तिच्या पतीने पाहिल्यानंतर त्याने तिला ब्लॅकमेल करून शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. त्याने गेल्यावर्षी मार्च महिन्यात जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिचा अश्लील व्हिडिओ तयार केला. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारीत करण्याची भिती दाखवून तिला ब्लॅकमेल करू लागला.

 

News English Summary: Shocking information has surfaced that a man made a pornographic video of his wife and spread it on social media. The incident took place at Bundgarden police station in Pune. A case has been registered against the husband at the Bundgarden police station.

News English Title: Husband made a pornographic video of his wife and made it viral on Facebook news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(148)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x