15 December 2024 12:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
x

भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार-खासदारांकडून पंकजा मुंडेंना इशारा वजा तंबी

Pankaja Munde, Devendra Fadnavis

सोलापूर: १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर खडसे आणि पंकजा मुंडे यांची खदखद समोर आली आहे. परंतु या जाहीर मेळाव्यानंतर सोलापूर येथील एका कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षविरोधी कारवाया केलेल्यांची गय केली जाणार नाही असा सूचक इशारा एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना अप्रत्यक्षपणे तंबी वजा इशारा दिला आहे.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की , मी जर काल गोपीनाथ मुंडे गडावर गेलो नसतो तर तीव्रता वाढली असती. मला अनेकांनी सांगितलं तुम्ही त्याठिकाणी जावू नका, तुमच्यावर हल्ला होईल वैगेरे बोलले पण मी त्याठिकाणी गेलो कारण मतभेद असतात, संवादाने खूप गोष्टी सुटतात असं त्यांनी सांगितले.

तसेच पंकजा मुंडे यांनी व्यासपीठावरुन बंड केलेल्यांची उदाहरण सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, पण महाराजांनी बंड मोगलांविरोधात केलं होतं, सावरकरांनी इंग्रजांविरोधात बंड केलं होतं. स्वकीयांविरोधात बंड करायचं नसतं. आपल्या माणसांविरोधात भांडायचं नसतं चर्चा करायची असते. घरातील भांडणं चव्हाट्यावर आणायची नसतात असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी मुंडे-खडसेंना दिला.

एका बाजूला चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसेंना इशारा दिला असताना दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. स्थानिक पातळीवर जातीपातीच राजकारण केल्यामुळेच पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. शिवाय, गोपीनाथ गडावर त्यांनी केलेलं वक्तव्य हे भारतीय जनता पक्षाच्या सच्चा कार्यकर्त्यास दुखवणारं असल्याच सांगत, ज्याला आपला मतदारसंघ सांभाळता येत नाही, ते महाराष्ट्रात काय फिरणार व काय दिवे लावणार? असं देखील खासदार काकडे म्हणाले आहेत.

दुसरीकडे माजी मंत्री आणि भाजप नेते बावनकुळे हे विदर्भातील ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात. एकनाथ खडसे, विनोद तावडे यांच्याप्रमाणे त्यांचेही तिकीट विधानसभा निवडणुकीत कापण्यात आले होते. मात्र तरिही त्यांनी कोणतेही बंडाचे निशाण फडकवले नाही. उलट मुंडे, खडसे पक्षाच्या विरोधात नाराजी प्रकट करत असताना बावनकुळे यांनी पक्षाची बाजू उचलून धरली आहे. बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला आणि भाजपला पुढे नेण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. नेता हा संपुर्ण समाजाचे नेतृत्व करत असतो. जातीने कोणताही नेता मोठा होत नसतो, तर कर्तुत्वाने मोठा होतो. सध्या भाजपचे सरकार नसल्यामुळे जाती-पातीचे राजकारण केले जात आहे, असा आरोप देखील बावनकुळे यांनी केला.

 

Web Title:  State BJP Leaders has again started Targeting BJP Leader Pankaja Munde

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x