सध्या देशात लोकसभेच्या निवडणुकांचा रणसंग्राम चालू आहे त्यातच जवळजवळ सगळ्याच पक्षांनी सध्या सोशल मीडियाला चांगलंच मनावर घेतलेलं दिसतंय. याचाच प्रत्यय आला तो भाजपच्या एका फेसबुक पोस्ट वरून. नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असलेलं भाजपचं IT सेल सध्या जरा गोंधळलेलं दिसतंय.
भाजपच्या IT सेल ने राज्य सरकारनं केलेल्या कामांना सोशल मीडियावर प्रसिद्धी देण्याचा धडाकाचा लावलेला आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र” या पेजवर नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अत्यल्प पाण्यावर घेतले हळदीचे पीक या ओळी लिहिलेल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला सलाम शेतकऱ्यांच्या जिद्दीला..! असं मुख्य शीर्षक देण्यात आलंय. या जाहिरातीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फेटा घातलेला फोटोही दिसतोय.
हळदीचं पीक म्हणून नारळाची छोटी झाडं दाखवून भाजपच्या IT सेल ने अकलेचे तारे तोडले आहेत. नेटिझन्सनी जोरदार टीका करायला सुरूवात केल्यानंतर हा फोटो त्या पेजवरून काढून टाकण्यात आलाय. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. नेटिझन्सनी या जाहिरातीचे स्क्रिनशॉटस् व्हायरल करायला सुरूवात केल्यावर भाजप IT सेल ला चूक लक्षात येताच मूळ फोटो बदलून त्याठिकाणी हळदीच्या पिकाचे फोटो टाकण्यात आले.
पोस्टचे काही स्क्रीनशॉट्स :
