15 August 2022 12:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Xiaomi CyberOne Robot | शाओमीने तयार केला स्मार्ट रोबोट, काम करताना मनुष्याच्या भावनेनुसार विचार करू शकणार Multibagger Mutual Funds | या 3 जबरदस्त मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना लक्षात ठेवा, SIP ने 3 वर्षात लाखोंचा फायदा Horoscope Today | 15 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 2023 Kia Ray | 2023 किआ रे कार लाँच, जबरदस्त लूकसह मिळणार शानदार असे फीचर्स Viral Video | तो बाईक सहित खड्ड्यात पडला की खड्ड्यातून वर आला?, विचित्र अपघाताचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय अमित शहांनी फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनवलं | तर फडणवीसांनी मुनगंटीवार आणि चंद्रकांतदादांचं राजकीय वजन घटवलं शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचं खातेवाटप | दादा भुसेंकडून कृषी खातं सत्तारांकडे, शिंदेंकडून मूळ शिवसैनिकांना हलकी खाती
x

नाथाभाऊंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने भाजप उ. महाराष्ट्रात अनाथ होणार | बच्चू कडूंची प्रतिक्रिया

Minister Bacchu Kadu, Eknath Khadse, North Maharashtra

अमरावती, २४ ऑक्टोबर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर आपली कन्या रोहिणी आणि निवडक कार्यकर्त्यांसह शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा कार्यक्रम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.

त्यानंतर राज्यातील राजकीय पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. माध्यमांशी बोलतांना राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही खडसेंचं महाविकास आघाडीत स्वागत केलंय.

एकनाथ खडसेंच्या जाण्यानं भाजपचं मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे. खरं तर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने भाजप उत्तर महाराष्ट्रात अनाथ झाल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादीला एकनाथ खडसे भेटल्यामुळे चांगले दिवस येतील, असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलंय. भाजप सोडता फडणवीस यांच्या वागणुकीमुळे असं करावं लागत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली तसेच एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

 

News English Summary: Speaking to media, Minister of State Bacchu Kadu also welcomed Khadse in the Mahavikas Aghadi. Eknath Khadse’s departure has caused huge loss to BJP. In fact, with Eknath Khadse joining the NCP, the BJP will not survive in North Maharashtra without becoming an orphan. Minister Bacchu Kadu expressed the view that good days will come when NCP meets Eknath Khadse.

News English Title: Minister Bacchu Kadu statement after Eknath Khadse joining NCP News updates.

हॅशटॅग्स

#BacchuKadu(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x