20 April 2024 12:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

फडणवीसांच्या राजकारणामुळे अजून एक भाजप समर्थक आमदार शिवसेनेत

Mira Bhayandar, Independent MLA Geeta Jain, Join Shivsena

मीरारोड, २४ ऑक्टोबर : भाजपच्या बंडखोर आमदार गीता जैन या आता शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेचे ताकद वाढण्यास मदत होणार आहे. भाजपमध्ये बंडखोरी करत त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. भाजपच्या त्या माजी महापौर होत्या. त्यामुळे भाजपला एकप्रकारे हा धक्का मानला जात आहे.

मीरा – भाईंदर मतदारसंघातील अपक्ष आमदार गीता जैन या उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होणार आहे. आज दुपारी १२.३० वाजता मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.

गीता जैन आधी भाजपमध्ये होत्या. त्यांनी भाजपच्या तिकिटावर मिरा भाईंदर मनपात निवडणूक जिंकून २०१५ मध्ये महापौर पद मिळवले होते. राज्यात २०१९च्या विधानसभा निवडणुकीवेळी सत्तेचे गणित सांभाळण्यासाठी गीता जैन यांना भाजपमधून बाहेर पडून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा सल्ला देण्यात आला. भाजपचे अधिकृत उमेदवार नरेंद्र मेहता यांचा पराभव करुन ही निवडणूक जिंकल्यानंतर आपल्याला मिरा-भाईंदरमध्ये भाजपचे नेतृत्व मिळेल अशी आशा गीता जैन यांना वाटत होती. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा दिला होता. प्रत्यक्षात भाजपने अद्याप नेतृत्व बदल केलेला नाही. याच कारणामुळे गीता जैन यांनी शिवसेनेची वाट धरण्याचा निर्णय घेतला आहे.

मिरा-भाईंदर येथे गीता जैन यांच्या समर्थकांची मोठी संख्या आहे. या समर्थकांच्या जोरावर शिवसेना पुन्हा एकदा मिरा-भाईंदर पालिका जिंकण्यासाठी उत्सुक आहे. सत्तेच्या नव्या गणितासाठी शिवसेना गीता जैन यांन पक्षात प्रवेश देण्याच्या तयारीत आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनामुळेच मिरा-भाईंदर भाजपचे नेतृत्व नरेंद्र मेहता यांच्याकडे कायम असल्याची चर्चा भाजपमध्ये आहे. अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देणाऱ्या गीता जैन यांनी सेनेत प्रवेश केल्यास भाजपचे मिरा-भाईंदरमधील गणित बिघडण्याची शक्यता आहे.

 

News English Summary: In another blow to the Bharatiya Janata Party (BJP) after senior leader Eknath Khadse quit the party, independent legislator from Mira-Bhayandar Geeta Jain is set to join the Shiv Sena on Saturday afternoon. MLA Geeta Jain, a BJP rebel, defeated BJP’s Narendra Mehta after the party refused to give her a ticket in the 2019 elections. The former Mira-Bhayandar mayor contested as an independent in the last assembly polls.

News English Title: Mira Bhayandar Independent MLA Geeta Jain will join Shivsena News Updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x