1 March 2024 9:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8 व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, वेतन वाढीची आकडेवारी समोर आली Numerology Horoscope | 01 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 01 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर प्राईस घसरणार? तज्ज्ञांनी टार्गेट प्राइस सोबत दिला महत्वाचा सल्ला Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, याआधी 1 वर्षात 200% परतावा दिला, नेमकं कारण काय? Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देतेय फ्री बोनस शेअर्स, अल्पावधीत वाढेल गुंतवणुकीचा पैसा Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! हे टॉप 3 शेअर्स 50 टक्केपर्यंत परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा
x

राणे पुत्राच्या कोकणी मतदारांना प्रचारादरम्यान धमक्या! जे गाव माझ्या विचाराचा सरपंच देईल त्याच गावाचा विकास अन्यथा...

BJP MLA Nitesh Rane

MLA Nitesh Rane | भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार नितेश राणे हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. यातच आता त्यांच्या एका वक्तव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. सरपंच निवडून आला नाही तर एक रुपयाचा निधी देणार नाही, अशी धमकी नितेश राणे यांनी गावकऱ्यांना दिली आहे. त्यांनी दिलेल्या या धमकीचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. या निवडणुकांच्या प्रचारामध्ये सर्वपक्षीय नेते व्यस्त आहेत. याच प्रचारादरम्यान नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे प्रचारासाठी गेले होते. यावेळी त्यांचं हे वक्तव्य असल्याचं सांगण्यात येत आहे.

काय म्हणाले नितेश राणे
जे गाव माझ्या विचाराचा सरपंच मला देईल, त्यात गावाचा मी विकास करीन, नाहीतर करणार नाही स्पष्ट सांगतो. माझ्याकडे कॅल्क्युलेशन आहेत. आपण लपाछपवीवाले नाही. राणे साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले आम्ही विद्यार्थी आहोत. आम्ही पोटात एक पोटात असं नाही. चुकून पण इथे माझ्या विचाराच्या सरपंच झाला नाही तर मी एकही रुपयांचा निधी देणार नाही. एवढी काळजी निश्चितपणे घेईन.

याला आता तुम्ही धमकी समजा नाहीतर अन्य काही. आपलं कॅलक्युलेशन स्पष्ट आहे. म्हणून मतदान करताना एक लक्षात ठेवा, सगळा निधी आता माझ्या हातात आहे. जिल्हा नियोजनचा निधी असो, ग्रामविकासचा विकास निधी असो, 25:15 चा निधी असो केंद्र सरकारचा निधी असो. मी सरकारमध्ये, सत्तेत असलेला आमदार आहे.

जिल्हाधिकारी असो, पालकमंत्री असो, संबंधित कुठलाही मंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, मुख्यमंत्री असतील हे कोणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत. म्हणून हा विषय तुम्ही सरळ स्पष्ट समजून घ्या. अगरं नितेश राणेंच्या विचाराच्या सरपंच आला नाही तर विकास होणार नाही, निधी येणार नाही हे सरळ स्पष्ट आहे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP MLA Nitesh Rane threating to voters of Sindhudurg video viral check details on 12 December 2022.

हॅशटॅग्स

#BJP MLA Nitesh Rane(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x