26 July 2021 12:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

राज्यात भाजपचे १०६ आमदार, २३ खासदार | उदयनराजे म्हणाले सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींना रस्त्यात आडवा

Maratha reservation

सातारा, ०७ मे | सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. लोकप्रतिनिधांना घराबाहेर पडू देऊ नका, त्यांना रस्त्यातच आडवा, असे आदेशच उदयनराजे यांनी मराठा बांधवांना दिले आहेत. उदयनराजे यांनी मराठा बांधवांना उघडपणे चिथावणी दिल्याने आगामी काळात मराठा आरक्षणाचा विषय अधिक तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द ठरवला आहे. त्यानंतर पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा सुप्रीम कोर्टाचा निकाल जरी असला तरी राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. वेगवेगळ्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी आतापर्यंत आपली भूमिका का स्पष्ट मांडली नाही?, असा संतप्त सवाल उपस्थित करत उदयनराजे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना टोला लगावला आहे. मराठा समाजाने यापुढे आंदोलन करू नये, त्यापेक्षा निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीना रस्त्यात आडवा आणि घरातून बाहेर फिरू देऊ नका, असा आदेश मराठा समाजाला दिला आहे.

कोणत्याही पक्षाचे का असेना त्या आमदार आणि खासदारांना रस्त्यात आडवा, जाब विचारा, मराठा आरक्षणाचं काय झालं हे विचारा, असं सांगतानाच जरी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केलं असलं तरी राज्य सरकारची काही जबाबदारी नाही का? राज्य सरकार जबाबदारीपासून हात झटकू शकत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

 

News English Summary: Bharatiya Janata Party MP Udayan Raje Bhosale has become aggressive after the Supreme Court canceled the Maratha reservation. Udayan Raje has given orders to the Maratha brothers not to let the people’s representatives out of the house, to stop them in the street. As Udayan Raje openly provoked the Maratha community, the issue of Maratha reservation is likely to heat up in the near future.

News English Title: Stop those MLAs and MPs from any party said MP Udayanraje Bhonsale over supreme court decision on Maratha reservation news updates.

हॅशटॅग्स

#Udayanraje Bhosale(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x