राणेंवर बोलल्याशिवाय मातोश्री बिस्कीट टाकत नाही हे राजेश क्षीरसागर सारख्यांना माहित आहे
मुंबई, २८ जुलै : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीनंतर भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात न जाता मातोश्रीवर बसून सर्व कारभार हाताळणे, कसे गरजेचे आहे, हे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला होता. सध्या राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत. एक मातोश्रीवर बसून काम करत आहेत आणि दुसरे राज्यभर फिरत आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.
पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर सडकून टीका केली होती. ‘चार महिन्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली आहे. त्यामुळे मॅच फिक्सिंग हे इथे आलेच आहे. कोरोनाच्या परिस्थितीनंतर उद्धव ठाकरे हे माध्यमांसमोर आले आहेत. मुळात संजय राऊत हे ठाकरेंचे स्तुतीपाठक आहे. त्यामुळे हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी इतर माध्यमांना मुलाखत द्यावी’, असे थेट आव्हानच पाटील यांनी दिले होते.
यावरून शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिलं होतं. मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट कसा होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवले आहे. चंद्रकांत पाटील यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवावी, असा इशारा शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी दिला होता. त्यांनी सोमवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी राजेश क्षीरसागर यांनी ठाकरे सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यांनी म्हटले होते की, चंद्रकांत पाटील यांना युतीचा इतिहास माहीत नसेल. चंद्रकांत पाटील हे आंबा पडल्यासारखे पक्षात अचानक मोठे झाले आहेत. मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट कसा होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी मातोश्रीवर विचारपूर्वक टीका करावी, असे क्षीरसागर यांनी म्हटले होते.
तसेच चंद्रकांत पाटील यांच्या टीकेमुळे उद्धव ठाकरे यांच्या कामावर कोणताही परिणाम होणार नाही. केवळ दिंडोरा पिटून राज्यकारभार होत नाही. उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांनी नरेंद्र मोदींनी गेल्या सहा वर्षात मीडियाला बाईट दिला का, हे सांगावे, असेही राजेश क्षीरसागर यांनी म्हटले होते.
दरम्यान, राजेश क्षीरसागर यांनी भाजपवर टीका करताना खासदार नारायण राणे यांचा देखील उल्लेख केल्याने आमदार नितेश राणे यांनी राजेश क्षीरसागर यांना चांगलेच झापले आहे. यावर ट्विट करताना आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, “राजेश क्षीरसागर सारख्या भुंकणाऱ्यांना माहित आहे.. राणेंवर बोलल्याशिवाय मातोश्री बिस्कीट टाकत नाही..राज्यपाल नियुक्त आमदारकीचे बिस्कीट आणि आमच नाव घेतले कि मिळेल असा गैरसमज झाला असेल.. पण रामदास कदम सारख्यांचे भुंकून किती दात उरले आणि काय अवस्था मातोश्रीने केली हे ही लक्षात ठेवावे!
राजेश क्षीरसागर सारख्या भुंकणाऱ्यांना माहित आहे.. राणेंवर बोलल्याशिवाय मातोश्री बिस्कीट टाकत नाही..
राज्यपाल नियुक्त आमदारकीचे बिस्कीट आमच नाव घेतले कि मिळेल असा गैरसमज झाला असेल.. पण रामदास कदम सारख्यांचे भुंकून किती दात उरले आणि काय अवस्था मातोश्रीने केली हे ही लक्षात ठेवावे!— nitesh rane (@NiteshNRane) July 28, 2020
News English Summary: Also, Chandrakant Patil’s criticism will not affect Uddhav Thackeray’s work. Dindora is not ruled by beating alone. Rajesh Kshirsagar had also said that those who questioned Uddhav Thackeray’s working style should state whether Narendra Modi has given a bite to the media in the last six years.
News English Title: BJP MLA Nitesh Rane criticized shivsena former MLA Rajesh Kshirsagar News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News