14 July 2020 6:21 PM
अँप डाउनलोड

भाजपचे शिष्टमंडळ उद्या राज्यपालांना भेटणार तर सेनेच्या आमदारांची तातडीची बैठक

Shivsena, BJP, Meet Governor

मुंबई: राज्यात महायुतीचंच सरकार येणार आहे, असं सांगतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ उद्या राज्यपालांना भेटून राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार असल्याचं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. मुनगंटीवार यांनी राज्यपालांना भेटून राजकीय परिस्थितीची माहिती देणार असल्याचं सांगितल्याने भाजप सरकार स्थापनेचा दावा करणार की नाही? याचा सस्पेन्स वाढला आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

सरकार स्थापन करण्याविषयी मुनगंटीवार म्हणाले, “जनतेनं महायुतीला जनादेश दिला आहे. आम्ही भूमिकेशी ठाम आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन होईल. मी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहोत. आमचा फॉर्म्युला ठरला असून, योग्य वेळी सांगितला जाईल. जी नाराजी आहे. ती दूर केली. अंधेरा ढलेगा, उजाला आयेगा,” असं सांगत मुनगंटीवार यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला.

महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत निर्माण झालेला पेच अद्यापही कायम आहे. शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम ठेवला आहे, तर काँग्रेसमधील एक गट शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी अनुकूल आहे. दुसरीकडे भाजपाने आता काहीशी नरमाईची भूमिका घेतली असली तरी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद न देण्यावर ते ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली आहे. उद्धव ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी ही बैठक होणार आहे.

‘शिवसेना, भाजप महायुतीला जनादेश आलेला आहे. पहिल्या दिवसापासून या जनादेशाचा सन्मान व्हावा, ही भाजपची ठाम भूमिका आहे. आता आम्ही निर्णय घेतला आहे की महायुतीचं सरकार आणण्यासाठीच आमची पुढची पावलं पडणार आहेत. उद्या मी आणि चंद्रकांत पाटील राज्यपालांना भेटायला जाणार आहोत स्पष्ट केलं आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Shivsena(892)#Sudhir Mungantiwar(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x