14 July 2020 5:44 PM
अँप डाउनलोड

सत्ता स्थापनेबाबत भाजप-शिवसेने दरम्यान आज मोठ्या घडामोडी

BJP, Shivsena

मुंबई: भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील सत्ता स्थापनेबाबतचा तिढा अद्यापही सुटलेला नसला तरी, बुधवारचा दिवस दोन्ही पक्षांच्या नेत्यांना चर्चेच्या टेबलावर आणणारा ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसाबाबतच्या उपाययोजनांसाठी बोलावलेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीला शिवसेनेचे सहा मंत्री उपस्थित होते. यातील शिवसेनेच्या दोन ज्येष्ठ मंत्र्यांसोबत मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाच्या काही ज्येष्ठ मंत्र्यांची चर्चा झाल्याचे समजते. दुसरीकडे आज, गुरुवारी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली असून, यात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल या मागणीवर आजही शिवसेना ठाम आहे. महायुतीचं सरकार येणार असं असलं तरी भारतीय जनता पक्ष नेते म्हणत असले तरी ती आकाराने मोठी असली तरी त्यात सामावलेल्या अनेकांचा स्वतःचा एकही आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळे महायुती कुणाची अन् कशी असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. सत्ता स्थापनेच्या या गणितामध्ये शिवसेनेच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक मातोश्रीवर पार पडत आहे. या बैठकीनंतर आमदारांचा कुणाचीही संपर्क होऊ नये यासाठी त्यांना अज्ञातस्थळी हलविण्यात येणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, तब्बल १४ दिवसांच्या राजकीय कोंडीनंतर भारतीय जनता पक्षाचे शिष्टमंडळ गुरुवारी राज्यपालांना भेटणार आहे. तशी माहिती भारतीय जनता पक्ष नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. राज्यात महायुतीचेच सरकार येणार असून चंद्रकांत पाटील आणि मी राज्यपालांना भेटून राजकीय परिस्थितीची माहिती देऊ असे मनुगंटीवार यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे राज्यातील सरकार स्थापनेच्या हालचालींना गुरुवारपासून वेग येणार आहे.

काँग्रेसल मधला एक गट असा आहे की जो शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तयार आहे. तर विरोधीपक्षनेते विजय वड्डेटीवर यांच्या मते, ९० टक्के काँग्रेसच्या आमदारांचं असं म्हणण आहे की, भारतीय जनता पक्षाला आता थांबवलचं पाहिजे आणि म्हणून शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे. हीच भूमिका मांडण्यासाठी काँग्रेसचे नेते उद्या दिल्लीत हायकंमांडची भेट घेणार आहे. तसंच शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी हायकंमांडकडे आग्रहाची भूमिका मांडणार आहेत. थोड्याचं दिवसांपूर्वी शरद पवार आणि सोनिया गांधींची भेट झाली हेती. त्यानंतर आता काँग्रेस नेते आणि सोनिया गांधींची यांच्या भेटीत सत्तास्थापनेबाबत काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(460)#Shivsena(892)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x